क्वालिटी फोटो सेंड करायचायं मग वापरा 'ही' पद्धत

व्हाट्सएपवरील फोटोची गुणवत्ता संकुचित न करता अशा प्रकारे एडिट करा.
क्वालिटी फोटो सेंड करायचायं मग वापरा 'ही' पद्धत

Want to send perfect image on WhatsApp without losing quality, follow this method

Dainik Gomantak

आजच्या युगात व्हॉट्सअ‍ॅप हे निःसंशयपणे सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लोक ते वापरतात आणि त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना संदेश पाठवतात. तुम्ही इतर लोकांना फोटो, व्हिडिओ किंवा स्टिकर्स पाठवता आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (Whatsapp) तुमच्या भावना व्यक्त करता. कधीकधी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवलेल्या फोटोची गुणवत्ता संकुचित होते. फोटो उच्च गुणवत्तेत रिसीव्हरकडे जात नाही.

फाईल्सच्या जलद ट्रांसफरसाठी टेक जायंट जवळजवळ 70 टक्के इमेज क्वालिटी बाय डीफॉल्ट संकुचित करते. अ‍ॅपमध्ये याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसताना, आम्ही या बातमीमध्ये अशाच काही युक्त्या सांगितल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही त्यांच्या मूळ गुणवत्तेत फोटो पाठवू किंवा शेअर करू शकता.

<div class="paragraphs"><p>Want to send perfect image on WhatsApp without losing quality, follow this method</p></div>
UPI पेमेंटमध्येही फसवणूक होण्याचा धोका, तुमचे ट्रॅन्जेक्शन अशा प्रकारे ठेवा सुरक्षित

व्हाट्सएपवरील फोटोची गुणवत्ता संकुचित न करता अशा प्रकारे एडिट करा

स्टेप 1- तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते उघडा आणि तुम्हाला ज्याला फोटो पाठवायचा आहे तो संपर्क उघडा.

स्टेप 2- चॅट स्क्रीनच्या तळाशी, तुम्हाला कॅमेरा आयकॉनच्या पुढे पेपर क्लिपसारखे चिन्ह दिसेल.

स्टेप 3- पेपर क्लिप चिन्हावर क्लिक करा, चिन्हांची सूची दिसेल.

स्टेप 4- आता Documents या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 5- पुढे, तुम्हाला तुमच्या फोनवरून डॉक्युमेंट म्हणून पाठवायचा असलेला फोटो निवडा.

स्टेप 6- तुम्हाला फोटो सापडत नसल्यास शीर्षस्थानी 'Browse other docs' पर्याय निवडा.

स्टेप 7- नंतर वर टॅप करा

स्टेप 8- फोल्डर्स तपासा, आणि तुम्हाला पाठवायची असलेली विशिष्ट इमेज फाइल सापडली की ती निवडा.

स्टेप 9- सेंड बटणावर क्लिक करा.

स्टेप 10- त्यानंतर, फोटो प्राप्तकर्त्याकडे पाठविली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com