पेमेंट करताना सीव्हीव्ही आणि सीव्हीसी कोड का टाकावे लागतात बरं?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

डेबिट कार्डने पेमेंट करताना सीव्हीव्ही आणि सीव्हीसी कोड वापरावा लागतो. हे कोड वापरल्याशिवाय आपले पेमेंट करताच येत नाही. आता हा सीव्हीव्ही कोड नेमका काय आहे माहिती आहे का?     

नवी दिल्ली- कोरोनाकाळात बाहेर जाण्यास वाव नसल्याने आपल्याला बहुतांशी कामं घरूनच करावी लागतात. मात्र, तोंडावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नवनवीन वस्तू खरेदी केल्याशिवाय उत्सव साजरा केल्या सारखाच वाटत नाही. यावेळी ते लोक ऑन खरेदीचा पर्याय निवडतात. या खरेदीसाठी पैसे देण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, ग्राहक डेबिट कार्डचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. डेबिट कार्डने पेमेंट करताना सीव्हीव्ही आणि सीव्हीसी कोड वापरावा लागतो. हे कोड वापरल्याशिवाय आपले पेमेंट करताच येत नाही. आता हा सीव्हीव्ही कोड नेमका काय आहे माहिती आहे का?     

डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या बरोबर मागच्या बाजूला हे दोनही कोड लिहलेले असतात. यास सीव्हीव्ही नंबरही म्हणतात. ऑनलाईन पेमेंट दरम्यान कन्फर्मेशनसाठी याचा उपयोग केला जातो. सुरक्षेच्या दृष्टीने साव्हीसी कोड अतिशय महत्त्वाचा असून ग्राहकाने तो गोपनीयच ठेवणं सोयीस्कर असतं  

सीव्हीव्ही आणि सीव्हीव्ही कोड म्हणजे काही नवीन आहे का ?

नाही. हा एक चार अंकी संकेतांक असून कार्डच्या मागील बाजूवरील एका पट्टीवर हा क्रमांक दिसून येतो. कोणत्याही स्वरूपाचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी हा संकेतांक वापरला जातो.   

सीव्हीव्हीची पार्श्वभूमी-  

डेबिट आणि क्रेडिट कार्डवर असणाऱ्या संकेतांकांना कार्ड सिक्युरिटी कोड असे संबोधले जाते. मायकेल स्टोनने या तंत्राचा १९९५ मध्ये शोध लावला. सीएससी बद्दल त्याची तपासणी झाल्यावर त्याला 'असोसिएशन ऑफ पेमेंट क्लिअरिंग सर्व्हिसेसने ही कल्पना स्वीकारली होती. सुरुवातीला सीव्हीव्ही कोड 11 अंकी होता, पण तो नंतर कमी करुन 3 ते 4 अंकांवर आणला गेला.

का लागतो हा सीव्हीव्ही कोड ?

सीव्हीव्ही कोड फक्त सुरक्षेसाठी वापरला जातो. याशिवाय ऑनलाईन खरेदी करताना सीव्हीव्ही कोडशिवाय पेमेंट करता येत नाही. हा कोड कार्डच्या मागच्या बाजूला असतो आणि जेव्हा-जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरतो तेव्हा त्याचा वरचा भाग समोर असतो आणि कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट कळू शकतो. पण CVV कोड कार्डच्या मागच्या बाजूला असल्यामुळे तो समजत नाही तसेच कुणाला शेअरही करू नये.

संबंधित बातम्या