WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अन्यथा कायमसाठी होईल बॅन

जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन करायचे नसेल तर आजच या गोष्टी करणे टाळाव्यात
Whats App
Whats AppDainik Gomantak

What's App Account: आजकाल सर्वांच्याच मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप आहे. व्हॉट्सअॅप देखील युजर्ससाठी नवनवे फिचर लाँंच करत असते. पण युजर्सची सुरक्षा लक्षात घेता नियमांचे उल्लघन केल्यास व्हॉट्सअॅप अकाउंट बंद देकील करु शकते. व्हॉट्सअॅप तुम्ही सर्वजण वापरत आहात तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा अशा काही चुका होतात ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होऊ शकते. चला तर मग जाणून घेउया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या युजर्संनी टाळल्या पाहिजे.

1. जर तुम्ही सतत स्पॅमसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर तसे करणे टाळावे. असे मॅसेज पसरवण्यासाठी अनेक लोक ग्रुप बनवतात. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

2. जर वापरकर्त्याने दिवसातून अनेक वेळा तक्रार केली असेल तर, WhatsApp खाते डीएक्टिवेट केले जाऊ शकते.

3. जर तुम्ही अनेक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सहभागी असाल आणि त्यामध्ये फेक बातम्या पसरवण्याचे काम करत असाल तर असे करणे टाळावे.

4. एपीके फाइल्स Android फोनवर डाउनलोड केल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या फाइल्समध्ये मॅलवेयर असतात. बर्‍याच वेळा हे अॅप स्वतःच इतर वापरकर्त्यांना मॅलिशयस  लिंक पाठवतात. यामुळे एपीके फाइल्स डाउनलोड करणे टाळा.

Whats App
EPFO ने पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज


5. जर तुम्ही दुसऱ्याच्या नावाने WhatsApp Account बनवले असेल आणि कंपनीला त्याची माहिती मिळाली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.यामुळे असे करु नका

6.
 जर तुम्ही WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus सारखे थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड केले असतील तर तुमचे मूळ WhatsApp Account बंद केले जाउ शकते.

7. जर खूप लोकांनी तुमच्या WhatsApp Account ची तक्रार केली किंवा खूप लोकांनी तुमच्या खात्याविरुद्ध तक्रार केली, तर तुमचे व्हॉट्सअॅप खाते बॅन होऊ शकते.

8.
 तुमचे WhatsApp Account बेकायदेशीर, अश्लील किंवा इतर कोणत्याही वापरकर्त्याला त्रास देत असेल तर बॅन होउ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com