Goa Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलवर जीएसटी लागू होणार? गोव्यात एक लिटरसाठी मोजावे लागणार एवढे पैसे

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठे संकेत दिले आहेत.
Union Finance Minister
Union Finance MinisterDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीत. मागील काही दिवसांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट केली होती. असं असले तरी देशातील महानगरांसह अनेक शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 100 रुपयांहून अधिक आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठे संकेत दिले आहेत. राज्य सरकारे आणि जीएसटी कौन्सिलही सहमत असेल तर पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या (GST) कक्षेत आणता येतील, असं अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.

Union Finance Minister
FM Nirmala Sitharaman: पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

"पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तरतूद आधीपासूनच आहे. माझ्याआधीच्या अर्थमंत्र्यांनीही याबाबतचा पर्याय खुला ठेवला आहे. राज्य सहमत झाल्यानंतर लगेच त्यांचा समावेश जीएसटीच्या कक्षेत करता येईल. आम्हाला ते करायचे नाही असं नाही."

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

Union Finance Minister
Bank MCLR Rates: 'या' बँकाकडून कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का, जास्त भरावा लागणार EMI

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com