'महंगाई डायन खाई जात है' आता खाण्यापिण्याचे भाव गगनाला भिडणार ? होलसेल निर्देशांकही वाढला

होलसेल किंवा ठोक निर्देशांक म्हणजेच होलसेल बाजारातील एक व्यापाऱ्याने दुसर्‍या व्यापाऱ्याकडून आकारलेली किंमत होय.
'महंगाई डायन खाई जात है' आता खाण्यापिण्याचे भाव गगनाला भिडणार ? होलसेल निर्देशांकही वाढला
Wholesale price index on 12%,Inflation on high Dainik Gomantak

देशात काही केल्या महागाई (Inflation) कमी होताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक गोष्टींच्या किंमती सातत्याने वाढतानाच पाहायला मिळत आहेत. यातच आता भर पडली आहे ती ठोक किंमतींची ऑक्टोबरमध्ये हा ठोक किंमत निर्देशांक 12.54 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर सप्टेंबरमध्ये तो केवळ 10.66 टक्के इतकाच होता. सरकारी आकडेवारीनुसार महागाई 5 महिन्यांच्या सर्वात जास्त उच्चकांवर वर पोहोचली आहे. इंधन आणि विजेच्या दरात झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईत वाढ झाली आहे. यासोबतच उत्पादित वस्तूंच्या किमतीत झालेली वाढही महागाईच्या या परिणामाला कारणीभूत ठरली आहे.(Wholesale price index on 12%,Inflation on high)

हा होलसेल किंवा ठोक निर्देशांक म्हणजेच होलसेल बाजारातील एक व्यापाऱ्याने दुसर्‍या व्यापाऱ्याकडून आकारलेली किंमत होय. या किमती व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या सौद्यांशी जोडलेल्या आहेत. त्या तुलनेत, ग्राहक किंमत निर्देशांक सामान्य ग्राहकांद्वारे ऑफर केलेल्या किमतींवर आधारित असतो. CPI वर आधारित चलनवाढीच्या दराला किरकोळ चलनवाढ किंवा किरकोळ महागाई असेही म्हणतात.किरकोळ महागाईची आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली असून सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.35 टक्क्यांवरून 4.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, हा आकडा आरबीआयच्या 2-6 टक्क्यांच्या महागाई दराच्या अंदाजात आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये WPI 10.6 टक्क्यांवरून 12.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, या कालावधीत खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर 1.14 टक्क्यांवरून 3.06 टक्क्यांवर पोहोचला आहे.इंधन आणि विजेच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाई वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

Wholesale price index on 12%,Inflation on high
आता छोट्या मुलांसाठी 'किड्स पॅन कार्ड', जाणून घ्या

तर दुसरीकडे आज सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने अकराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दहा दिवस उलटूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.बुधवारी सर्वसामान्यांना दिलासा देत तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये डिझेलचा दर १०० रुपयांच्या वर पोहोचला होता. देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा परिणाम सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com