ओपेक प्लस मध्ये ठरणार पेट्रोल डिझेल चे दर

पेट्रोल डिझेल च्या किंमती कमी होणार कि पुन्हा वाढणार हे आज होणाऱ्या (Opec+) च्या बैठकीच्या निकालावर ठरणार.
will have decided petrol and diesel rates in OPEC Plus meeting

will have decided petrol and diesel rates in OPEC Plus meeting

Dainik Gomantak

भारतात महागलेल्या पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांमुळे (Costly Petrol Diesel Price) सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की,अडचणी वाढणार या संदर्भात आज मोठा निर्णय होऊ शकतो. जगभरातील तेल उत्पादक देशांचा समूह ( Oil Producing Nations) असलेल्या ओपेक प्लस या संघटनेची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक होत आहे, ज्यामध्ये कच्या तेलाचे ( Crude Oil) उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो. ओपेक प्लस (Opec+)ही 23 देशांची संघटना आहे, ज्याचे नेतृत्व सौदी अरेबिया आणि रशिया करत आहेत.

<div class="paragraphs"><p>will have decided petrol and diesel rates in OPEC Plus meeting</p></div>
भारत सरकारला मोठा धक्का! कॅनडामध्ये एअर इंडियाची मालमत्ता जप्त

वाढू शकते का तेलाचे उत्पादन

कच्च्या तेलाचे प्रतिदिन 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्यास मंजूरी मिळू शकते. ओपेक प्लस देशाचे म्हणने आहे की,कोरोना वायरस ( Covid 19) चा नविन प्रकार असलेला ओमिक्रोन चा फारसा प्रभाव तेलाच्या मागणीवर फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे अश्या स्थितीत मागणीत मोठी घट होण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी ओपेक प्लस ( Opec+) फेब्रुवारी 2022 पासून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवू शकते.

कोरोना महामारीमुळे मार्च 2020 मध्ये घटले उत्पादन

मार्च 2020 मध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत तीव्र घट झाल्यानंतर, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लॉकडाऊनमुळे ओपेक प्लस ( Opec+)देशांमध्ये उत्पादन 10 दशलक्ष बॅरलने कमी केले गेले होते. मात्र,ऑगस्ट महिन्यापासून ते पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे. आतापर्यंत 5.8 दशलक्ष बॅरल उत्पादनात कपात करण्यात आली आहे,मात्र आता फेब्रुवारीपासून 4 लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन पुन्हा सुरू केले जाऊ शकते का, यावर निर्णय घेतला जाईल.

<div class="paragraphs"><p>will have decided petrol and diesel rates in OPEC Plus meeting</p></div>
Budget 2022: एक्सपोर्टला चालना देण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकतात मोठे बदल

कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवल्यास भारताला फायदा

जर कच्या तेलाचे उत्पादन वाढवण्यास मंजूरी मिळाली तर याचा सर्वात जास्त फायदा हा भारताला होणार आहे.कारण येथे सर्वात जास्त लोक वाढत्या किंमतीमुळे हैराण झाले आहे. कच्या तेलाचे उत्पादन वाढवल्यास भारतात पेट्रोल डिझेल च्या किंमती कमी होऊ शकतात. सध्या अमेरिका आणि भारतासह अनेक देश ओपेक प्लस ( Opec+) देशांकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची मागणी करत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल जवळ जवळ 80 डॉलर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com