तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा पीएफ खात्यातून काढा पैसे, 'ही' आहे सोपी प्रक्रिया

बहुतेक लोक जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा कर्जाचा मार्ग स्वीकारतात.
तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा पीएफ खात्यातून काढा पैसे, 'ही' आहे सोपी प्रक्रिया
MoneyDainik Gomantak

बहुतेक लोक जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा कर्जाचा मार्ग स्वीकारतात, परंतु जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि तुम्ही दरमहा तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करत असाल तर कर्ज घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढू शकता. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तुम्हाला तुमचे पैसे (Money) गरजेनुसार काढण्याचे स्वातंत्र्य देते. (Economic latest news)

नोकरी (Job) गेली किंवा कोणी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. याशिवाय तुम्ही तुमचा भविष्य निर्वाह निधी आजारपण, मुलांचे शिक्षण ते घर बांधण्यासाठी वापरू शकता. पण जर तुमच्याकडे पैसे काढण्यासाठी ठोस कारण नसेल तर तुम्ही जास्त पैसे काढू शकत नाही.

Money
संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी! 9 क्षेत्रांमध्ये वाढला रोजगार

अशा प्रकारे पीएफ खात्यातून पैसे काढा

1- UAN पोर्टलवर जा आणि लॉग इन करा. कॅप्चा प्रविष्ट करा आणि साइन इन करण्यासाठी पुढे जा.

2- आता वरच्या मेनूमध्ये दिसणार्‍या 'ऑनलाइन सर्विसेज' टॅबवर जा आणि 'क्लेम (फॉर्म 31, 19 आणि 10C)' या पर्यायावर क्लिक करा.

3- हे तुम्हाला सदस्य तपशील, केवायसी तपशीलांसह नवीन पृष्ठावर घेऊन जाईल. आता येथे तुमचा बँक खाते क्रमांक टाका आणि 'व्हेरिफाय' वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पीएफची सेवा सोडण्याचे कारण भरावे लागेल

4- 'सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग' नावाचा पॉप अप दिसेल. तेथे 'Yes' वर क्लिक करा.

5- पुन्हा ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि 'मला अर्ज करायचा आहे' पर्याय निवडा आणि तेथून 'केवळ पीएफ काढणे (फॉर्म 19)' पर्याय निवडा.

6- 'पलीट अ‍ॅड्रेस' विभाग भरा आणि तुमच्या पासबुकची किंवा चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com