RBI चा ATM वापराबाबत नवीन नियम,थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री

जून 2019 मध्ये, आरबीआयने(RBI) एटीएम(ATM) व्यवहारांच्या इंटरचेंज संरचनेवर विशेष लक्ष देऊन एटीएम शुल्काचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.
Withdrawing money from ATM? Here are RBIs new ruleset
Withdrawing money from ATM? Here are RBIs new rulesetDainik Gomantak

आजपासून एटीएम(ATM) वापरणाऱ्या आपल्या सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण एटीएममधून पैसे काढणे आता आजपासून महाग होणार आहे.वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच एटीएम व्यवहारांवर शुल्क वाढवले ​​असून आरबीआयच्या या नवीन नियमांनुसार आता एटीएम ट्रांजेक्शन वापराच्या आर्थिक व्यवहारांसाठीचा शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये केले आहे. बिगर आर्थिक व्यवहारांचे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहे. हे नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होतील.(Withdrawing money from ATM? Here are RBIs new ruleset)

आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी बँकांकडून व्यापाऱ्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटच्या वेळी दिली जाते. हा शुल्क नेहमी बँका आणि एटीएम कंपन्यांमध्ये वादाचा विषय राहिला आहे.

जून 2019 मध्ये, आरबीआयने एटीएम व्यवहारांच्या इंटरचेंज संरचनेवर विशेष लक्ष देऊन एटीएम शुल्काचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी हे बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट प्रक्रिया करणाऱ्याला आकारले जाणारे शुल्क आहे.

Withdrawing money from ATM? Here are RBIs new ruleset
RBI Digital Currency चा आपल्याला फायदा काय

काय आहे हा नेमका चार्ज -

जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट करतो तेव्हा पेमेंटवर प्रक्रिया करणाऱ्या व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून व्यवहार शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत जर ग्राहक इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरतो, तर अशा स्थितीत तुमची बँक त्या इतर बँकेला इंटरचेंज फी पुरवते, याला इंटरचेंज चार्ज म्हणतात.

याआधीच रिझर्व्ह बँकेने जूनमध्येच सांगितले होते की 1 ऑगस्टपासून एटीएमचे इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये केले जाईल. एटीएम व्यवहारातील हे बदल पूर्ण 9 वर्षांनंतर घडले आहेत.

Withdrawing money from ATM? Here are RBIs new ruleset
Bank Holidays List August 2021: ऑगस्ट महिन्यात तुमची बँक राहील इतके दिवस बंद

ICICI बँकेच्या नियमात ही मोठे बदल -

तर दुसरीकडे आयसीआय बँकेच्या ग्राहकांना सुद्धा वाढीव चार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजेच एटीएम मधून ट्रांजेक्शन करणाऱ्या आयसीआय बँकेच्या ग्राहकांना सुद्धा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे चेकबुकच्या वापरयाच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. हे सर्व नवीन शुल्क 1 ऑगस्टपासून लागू होतील.

त्याचप्रमाणे 1 ऑगस्टपासून ICICI बँकेचे ग्राहक त्यांच्या गृह शाखेमधून 1 लाख रुपये काढू शकणार आहेत. मात्र जर त्यापेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्यासाठी प्रत्येक 1,000 रुपयावर 5 रुपये अधिक चार्जे द्यावे लागतील. गृह शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमधून पैसे काढण्यासाठी दररोज 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाहीत मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्यासाठी प्रत्येक 1,000 रुपयावर 5 रुपये अधिक चार्जे द्यावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com