मोदी सरकार बॅकफूटवर! अल्पबचत व्याजदर कपात नजरचुकीने, अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

बुधवारी जाहीर करण्यात आले की सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) यासारख्या छोट्या बचत योजनांवर 1.1 टक्के कपात केली आहे. मात्र आता व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे.

नवी दिल्ली: बुधवारी जाहीर करण्यात आले की सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) यासारख्या छोट्या बचत योजनांवर 1.1 टक्के कपात केली होती. ही कपात 1 एप्रिलपासून 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत केली गेली आहे. मात्र आता व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. 24 तासात अर्थ मंत्रालयाने आपला आदेश मागे घेतला आहे. व्याजदर कमी करण्याचा आदेश चुकून देण्यात आला. छोट्या बचत योजनांवर जुना व्याज दर कायम राहील, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या.

केंद्रीय बँकेने बँकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी ई-मँडेट सुविधा देण्यास सांगितले होते

व्याजदर कपातीच्या निर्णयावरून घसरलेल्या व्याजदराच्या कल बघता हे पाऊल उचलले गेले आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पीपीएफवरील व्याज 0.7 टक्क्यांनी कमी करून 4.4 टक्के करण्यात आले होते, तर एनएससीवर ते 0. 9 टक्क्यांनी कमी करून 9.9 टक्क्यांवर आणले गेले होते. छोट्या बचत योजनांवरील व्याज तिमाही आधारावर सूचित केले जाते. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत विविध छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात बदल करण्यात आला होता.

पंचवार्षिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज दर 0.9 टक्के कमी करून 5. 6 टक्के करण्यात आला होता. या योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर दिले जाते. पहिल्यांदा बचत खात्यातील ठेवीवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 3.5.. टक्के केले होते. आतापर्यंत त्यात वर्षाकाठी 4 टक्के व्याज मिळत होते. व्याजातील जास्तीत जास्त कपात एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 1.1 टक्के करण्यात आले होते. त्यावर व्याज 4..4 टक्के असेल असे ही त्या नव्या नियमात सांगण्यात आले होते.

देशातील भांडवली बाजारात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले मोठे चढ-उतार कायम 

संबंधित बातम्या