SBI बँकेसंदर्भातील कामे करता येणार एका फोनद्वारे

SBI च्या फोन कॉल सेवेसह, ग्राहकाना घरी राहून विविध सुविधांचा लाभ घेता येईल. टोल फ्री (Toll free) क्रमांकावर कॉल करून ग्राहक बँक खात्यातील सर्व माहिती घेता येईल.
SBI बँकेसंदर्भातील कामे करता येणार एका फोनद्वारे
SBI Bank Dainik Gomantak

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (State bank of India) या राष्ट्रीयकृत बँकेचा सर्वाधिक विस्तार झालेला आहे. SBI कडून वेळोवेळी ग्राहकांना नवनवीन सोईस्कर उपाययोजना देत असते. यामध्ये आता ऑनलाईन प्रणालीचा (Online System) SBI च्या ग्राहकांना फायदा होत असून बँकेतील ताण कमी होत आहे.

बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी (SBI Customers) मोबाईल वरून अनेक सेवा सुरू केलेल्या आहेत. ग्राहकांना आता घरी राहून एक फोन कॉलवर विविध सेवांचा लाभ घेता येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने फोन कॉल सेवेसाठी टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.

SBI Bank
SBI निवृत्तीवेतनधारकांसाठी गुड न्यूज

SBI च्या फोन कॉल सेवेसह, ग्राहकाना घरी राहून विविध सुविधांचा लाभ घेता येईल. टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ग्राहक बँक खात्यातील शिल्लक पाहू शकतात. तसेच ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती देखील मिळवू शकतील. याचा फायदा ग्राहकांना घरी राहून अथवा कोठेही अगदी एका फोन वर बँकेसंबंधीचे सेवा काम होतील.

तसेच, ATM संदर्भातील कामे करता येतील. जसे की, एटीएम कार्ड पुन्हा इश्यू करता येईल. चालू असणारे ATM कार्ड जर हरवले तर ब्लॉक करता येईल. ATM चा पिन क्रमांक जनरेट करता येईल. तसेच ATM कार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम कार्डसाठी या क्रमांकाची मदत ही घेता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com