Most Expensive Tea: काय सांगता! फक्त एक किलो चहासाठी मोजावे लागतात 'एवढे' पैसे

Most Expensive Tea: तुम्हाला माहितीय का सर्वात महाग चहा कुठल्या शहरात मिळतो?
Most Expensive Tea
Most Expensive TeaDainik Gomantak

अनेक लोक दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतात. आपल्याकडे अनेक प्रकारच्या चहा पावडर मिळतात. त्यांची वैशिष्ट्ये, गुणधर्मानुसार याच्या किंमतीतही बदल होतो. काही स्वस्त तर काही महागडी चहा पावडर मिळते. एका खास चहा पावडरच्या एक किलोच्या पॅकेटची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. हि चहा पावडर मिळते तरी कुठे? हे जाणून घेण्यासाठी पुर्ण बातमी नक्की वाचा.

  • जगातील सर्वात महागडी चहा पावडर

जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये (China) मिळते. या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी (Da-Hong Pao Tea) आहे. चीनमधील फुजियानमधील वुईसन भागातच ही चहा पावडर मिळते. या चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये आहे.

  • ही चहा पावडर एवढी महाग का?

ही चहा पावडर सध्या दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते. डा-होंग पाओ टी ची पाने अतिशय कमी असतात. काही ठिकाणी ग्राहक 10 ग्रॅम चहा पावडरसाठी 10 ते 20 लाख रुपये मोजतात. सामान्य चहाप्रमाणे या चहाचे उत्पादन घेतले जात नाही.

Most Expensive Tea
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त
  • आरोग्यदायी चहा

चीनच्या लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle) चहाचे एक वेगळे स्थान आहे. काही प्रकारचे चहा हे आरोग्यदायी, असतात असे चीनमध्ये म्हटले जाते. चीनमध्ये मिळणारी ही महागडी चहा पावडरदेखील आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. या चहा पावडरमुळे अनेक गंभीर आजार बरे होत असल्याचे म्हटले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com