यंदा केंद्रसरकार मांडणार 'पेपरलेस' अर्थसंकल्प 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण 2020-2021 या वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला 'पेपरलेस'पध्दतीने मांडण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : देशाच्या अर्थचक्राला कोरोना महामारीने घरघर लावली आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा अजूनही घसरलेला असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण 2020-2021 या वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला 'पेपरलेस'पध्दतीने मांडण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही.या वर्षी तरी कोरोनाचं संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अर्थसंकल्पाची छपाई केली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.अर्थसंकल्पाच्या डिजिटल प्रती खासदार,अधिकारी, आणि मिडियाला देण्यात येणार आहेत.

दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल असला तरी टेक्नोसॅव्ही नसणाऱ्या खासदारांना अर्थसंकल्पाच्या प्रति उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.मात्र मोदीसरकारने कोरोनाच्या कारणाचा हवाला देत सॉप्ट कॉपीचा मार्ग अवलंबला असल्यामुळे अनेक खासदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या