Zomato अन् Blinkit होणार एक! गुंतवणूकदार विकतायेत झोमॅटोचे शेअर्स

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स मंगळवारी व्यापारात 3 टक्क्यांपर्यंत घसरले.
Zomato
Zomato Dainik Gomantak

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे (Zomato) शेअर्स मंगळवारी व्यापारात 3 टक्क्यांपर्यंत घसरले. इंट्राडे मध्ये, कंपनीचे शेअर्स 5.36% नी खाली, तर 66.15 वर त्याचा व्यवहार होत आहे. ब्लिंकिटचे अधिग्रहण समोर आल्याचे वृत्त आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Zomato and Blinkit are going to be one Investors have begun selling shares of Zomato)

Zomato
गौतम अदानी करणार हेल्थकेअर क्षेत्रात एन्ट्री, ही कंपनी विकत घेण्यासाठी लावणार बोली

17 जून रोजी बैठक होणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Zomato च्या बोर्डाची बैठक 17 जूनला होण्याची असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. Zomato च्या बोर्डाची बैठक 17 जून रोजी पार पडणार आहे. हे शक्य आहे कारण या दिवशी, क्विक-कॉमर्स कंपनी ब्लिंकिटच्या अधिग्रहण करारावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो आणि या करारावर स्वाक्षरी देखील केली जाऊ शकते. करारानुसार, ब्लिंकिटचे मूल्य $700 दशलक्ष एवढे असू शकते.

शेअर-स्वॅप डील

हा करार झोमॅटोच्या काही शेअर्सशी जोडलेला आहे जो ब्लिंकिटच्या गुंतवणूकदारांना शेअर-स्वॅप डीलचा एक भाग म्हणून असणार आहे. या डील अंतर्गत झोमॅटोला एका शेअरसाठी ब्लिंकिटचे 10 शेअर्स मिळणार आहेत. ब्लिंकिटचे गुंतवणूकदार देखील सहा महिन्यांच्या लॉक-इन कालावधीची अपेक्षा करत आहेत. झोमॅटोची ब्लिंकिटमध्ये आधीपासूनच गुंतवणूक आहे. झोमॅटो ब्लिंकिटचा सुमारे 10% चा मालक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com