Zomato ने Grocery डिलीवरी सर्विस बंद करण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या कारण?

कारण ऑर्डर पूर्ण करण्यात अंतर, खराब कस्टमर एक्सपीरियंस आणि प्रतिस्पर्ध्यांकडून वाढती स्पर्धा. तसेच कंपनी 15 मिनिटांत एक्सप्रेस डिलिव्हरीचे आश्वासन देत होती.
Zomato ने Grocery डिलीवरी सर्विस बंद करण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या कारण?
ZomatoDainik Gomantak

ऑनलाईन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने Grocery डिलीवरी सर्विसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला झोमॅटोच्या अॅपवर ग्रॉसरी सर्विस (Grocery Delivery Service) मिळणार नाही. फूड टेक प्लॅटफॉर्मने आपली नुकतीच सुरु केलेली किराणा वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण ऑर्डर पूर्ण करण्यात अंतर, खराब कस्टमर एक्सपीरियंस आणि प्रतिस्पर्ध्यांकडून वाढती स्पर्धा. तसेच कंपनी 15 मिनिटांत एक्सप्रेस डिलिव्हरीचे आश्वासन देत होती.

तसेच, कंपनीने पुढे म्हटले आहे की, ग्रॉफर्समधील (Grofers) गुंतवणूक केल्याने त्याच्या इन-हाउस ग्रॉसरी परिणामांपेक्षा चांगले परिणाम मिळतील. मनीकंट्रोलकडे झोमॅटोने त्याच्या ग्रॉसरी पार्टनर्संना पाठवलेल्या मेलची प्रत आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्याने मनीकंट्रोलकडून ग्रॉसरी डिलीवरी सर्विस बंद केल्याची पुष्टी केली आहे.

Zomato
योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बॅंकिंग आवश्यक: सीतारामन

प्लॅटफॉर्मवर किराणा डिलीवरी चालवण्याची कोणतीही योजना नाही

दरम्यान, झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे किराणा पायलट बंद करण्याचा निर्णय घेतला असून सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारची किराणा डिलीवरी चालवण्याची कोणतीही योजना नाही. कंपनीने अलीकडेच 100 मिलियन डॉलर (745 कोटी रुपये) गुंतवणूकीसह ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्म ग्रोफर्समध्ये काही भाग खरेदी केला होता.

शिवाय, कंपनीचे सीएफओ अक्षत गोयल (Akshat Goyal) म्हणाले होते की, झोमॅटोने या नवीन क्षेत्रात अधिक अनुभव मिळवण्याच्या उद्देशाने आणि व्यवसायासाठी नियोजन आणि धोरण आखण्याच्या उद्देशाने ग्रॉफर्समध्ये भाग खरेदी केला आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही लवकरच झोमॅटो अॅपवर किराणा मालाची ऑनलाईन विक्री करण्याची सेवा सुरु करु आणि यासह आम्ही या क्षेत्रात पाऊल टाकू आणि आपण किती वेगाने प्रगती करु शकतो ते ही पाहू.

Zomato
केंद्राच्या PLI योजनेचा कोणाला आणि कसा होणार लाभ

पायलट किराणा वितरण सेवा 17 सप्टेंबरपासून बंद

झोमॅटोने 11 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या किराणा भागीदारांना पाठविलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की त्याने 17 सप्टेंबरपासून पायलट किराणा वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने काही निवडक बाजारांमध्ये ग्रॉसरी सर्विस पायलटची सुरुवात केली होती. याअंतर्गत, ग्राहकांना 45 मिनिटांच्या आत किराणा डिलीवरी देण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com