Gautam Adani : गौतम अदानी टॉप-30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींकडे शिल्लक राहिली 'एवढीच' संपत्ती

मुकेश अंबानी 8 व्या क्रमांकावर
Gautam Adani Net Worth
Gautam Adani Net Worth Dainik Gomantak

Gautam Adani Net Worth: हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून उद्योगपती गौतम अदानी संपत्ती कमविण्याच्या सोडाच उलट संपत्ती गमाविण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहेत, असे म्हणावे लागते.

हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सुरू झालेल्या घसरणीमुळे अदानींच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. या रिपोर्टच्या एक महिन्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे $81 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

त्यामुळे एका महिन्यात ते जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून थेट 30 व्या क्रमांकाच्याही खाली घसरले आहेत. गौतम अदानी सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत 33 व्या क्रमांकावर आले आहेत.

Gautam Adani Net Worth
Subsidy for Green House: ग्रीन हाऊससाठी सरकार देतेय 70 टक्के अनुदान

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाला चांगलाच झटका दिला आहे. 2023 हे वर्ष भारतीय अदानींसाठी अत्यंत वाईट ठरत आहे. यास संस्थेने 24 जानेवारी रोजी रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतून घसरत खाली आले आहेत.

अदानी पहिल्यांदा टॉप 10 मधून नंतर नंतर टॉप-20 मधून बाहेर पडले आणि आता ते टॉप-30 मधुनही बाहेर पडले आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये, अदानी प्रचंड कमाई करत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. वर्षाच्या अखेरीसही ते चौथ्या क्रमांकावर होते.

कमाईच्या बाबतीत सर्व श्रीमंतांना मागे टाकून भारतीय अब्जाधीश यावर्षीही एक नवा टप्पा गाठतील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण जानेवारीचा पहिला महिना संपण्यापूर्वीच अमेरिकेतून एक अहवाल आला आणि चित्र पूर्णपणे बदलले. कमाईच्या बाबतीत नाही तर जास्तीत जास्त संपत्ती गमावण्याच्या बाबतीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर पोहोचले.

Gautam Adani Net Worth
आता 'हा' देशही पाकिस्तानच्या वाटेवर; 2 पेक्षा जास्त बटाटे, टोमॅटो खरेदीवर बंदी

अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 12 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. शेअर्सच्या किमती घसरल्याने गौतम अदानी यांची नेटवर्थही कमी झाली.

मालमत्तेतील घसरणीबद्दल बोलताना गौतम अदानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे $81 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती आता $35.3 बिलियनवर आली आहे. एवढ्या संपत्तीसह ते जगातील ३३ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

एका महिन्यातच अदानींचे शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये, गौतम अदानी $ 150 अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीकडे वाटचाल करत होते.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाल्यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडे आला आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी $ 84.1 अब्ज संपत्तीसह टॉप-10 श्रीमंतांमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत. अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा 48.8 अब्ज डॉलरने जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com