Reliance vs Adani Group: अदानी ग्रुपला लवकरच मागे टाकणार मुकेश अंबानींची रिलायन्स

एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे मुल्य अदानी ग्रुपमधील सर्व कंपन्यांच्या मुल्याइतके होणार
Ambani Vs Adani
Ambani Vs AdaniDainik Gomantak

Reliance vs Adani Group: बाजार भांडवल (मार्केट कॅप) च्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज. या कंपनीला गेल्या आठवड्यात सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यामुळे आता रिलायन्स कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपला देखील मागे टाकू शकते.

Ambani Vs Adani
Bar Codes on Medicines: औषधांच्या पाकिटावर क्यूआर कोड होणार अनिवार्य! केंद्राचा मोठा निर्णय

म्हणजेच अदानी समुहात जितक्या कंपन्या आहेत, त्या सर्वांचे बाजार भांडवल जितके कोटी रूपये होत असेल त्यापेक्षा एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजारभांडवल लवकरच अधिक होईल. दोन्हीतील अंतर आता खूप कमी राहिले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या दोन आठवड्यात सलग वाढ दिसून आली आहे. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 18,41,994.48 कोटी रूपयांवर पोहचले आहे. अदानी ग्रुपमधील 7 कंपन्यांची एकुण मार्केट कॅप (बाजार भांडवर) 18,73,844.82 कोटी रूपये आहे. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा अदानी ग्रुपचे बाजारभांडवल केवळ 31,850.34 ​कोटी रूपयांनी जास्त आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच अदानी ग्रुपला मागे टाकू शकतो.

Ambani Vs Adani
Business Idea in Winter: हिवाळ्यात सुरू करा ड्राय-फ्रुटचा बिझनेस; इम्यूनिटीसह वाढवा इनकम

देशातील टॉप टेन कंपन्यांतील 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,15,837 कोटी रूपयांची वाढ झाली. यात सर्वाधिक 71 हजार कोटीचा वाटा एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे. 10 पैकी 2 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घटही दिसून आली. कुठल्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये किती वाढ झाली आणि कंपनीचे व्हॅल्युएशन किती झाले आहे, हेदेखील जाणून घेऊ.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये 71,462.28 कोटींची वाढ होऊन ती आता 18,41,994.48 कोटी रूपये झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मार्केट कॅपिटलमध्ये 18,491.28 कोटी रूपयांची वाढ होऊन ते 6,14,488.60 कोटींवर गेले आहे. टाटांच्या टीसीएस च्या मार्केट कॅपमध्ये 18,441.62 कोटी रूपये वाढ होऊन ती 12,58,439.24 कोटी रूपये झाली. इन्फोसिसच्या मार्केटकॅपमध्ये 3,303.5 कोटींची वाढ होऊन एकूण बाजारभांडवल 6,89,515.09 कोटींवर पोहचले आहे. अडानी इंटरप्राइजेजच्या मार्केट कॅपमध्ये 2,063.4 वाढीसह मार्केट कॅप 4,47,045.74 कोटी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com