RBI लॉन्च करणार डिजीटल Cryptocurrency

बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला CBDC (central bank digital currencies) असे नाव देण्यात आले आहे.
RBI will launch digital cryptocurrency
RBI will launch digital cryptocurrencyDainik Gomantak

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आपल्या डिजिटल चलनासंदर्भात (Digital Currency) बऱ्याच काळापासून काम करत आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das Governor of RBI) म्हणाले की, डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी ट्रायल प्रोग्राम सुरू करू शकते. जगभरातील केंद्रीय बँका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि यूकेच्या मध्यवर्ती बँका व्यावसायिक आणि सार्वजनिक वापरासाठी क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) विचार केला जाण्याची शक्यता आहे.

कोणत्याही केंद्रीय बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला CBDC (central bank digital currencies) असे नाव देण्यात आले आहे. या चलनाला पूर्ण कायदेशीर मान्यता असेल. सध्याच्या फियाट चलनाची ही डिजिटल आवृत्ती असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, आम्ही सीबीडीसीबद्दल खूप सावध आहोत, कारण ती पूर्णपणे नवीन संकल्पना आहे.

RBI will launch digital cryptocurrency
RBI Digital Currency चा आपल्याला फायदा काय

आर्थिक व्यवस्थेवरील परिणामाचे मूल्यांकन

डिजिटल चलनाच्या विविध पैलूंवर रिझर्व्ह बँक गांभीर्याने विचार करत आहे. सर्वप्रथम ते प्रत्येक प्रकारे सुरक्षित असले पाहिजे. या व्यतिरिक्त, त्याचा भारतीय वित्तीय व्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये. विशेषतः कोरोना नंतर अर्थव्यवस्थेवर अजूनही दबाव आहे. अशा स्थितीत, सेंट्रल बँक आर्थिक बाजाराबाबत अत्यंत सावध आहे.

क्रिप्टोकरन्सी अॅडॉप्शन इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने बंदी हटवल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसंबंधी भारतातील क्रेझ खूप वाढली आहे. ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताने चीन, अमेरिका, यूके आणि इंग्लंड सारख्या देशांना मागे टाकले आहे. जून 2020 ते जुलै 2021 दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकृती दरात 880 टक्के वाढ झाली आहे. 2019 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत (ऑक्टोबर-डिसेंबर 2019), त्यात 2300 टक्के ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

RBI will launch digital cryptocurrency
चीनी कंपनीवर EDची धाड, 107 कोटी रुपये केले जप्त

सध्या विविध पैलूंवर काम चालू आहे

ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर डेप्युटी गव्हर्नर टी.रबी शंकर म्हणाले होते की, रिझर्व्ह बँक या वर्षाच्या अखेरीस कायदेशीर डिजिटल चलनाचे मॉडल ऑफ ऑपरेशन आणू शकते. या चलनाच्या सर्व बाबींवर तंत्रज्ञान, वितरण यंत्रणा, प्रमाणीकरण यंत्रणा यांवर काम करत आहे. भारत टप्प्याटप्प्याने डिजिटल चलन सुरू करण्याचा विचार करत आहे, असे वक्तव्य त्यांनी 22 जुलै रोजी केले होते.

खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता कायम - गवर्नर दास

दास म्हणाले की, डिजिटल चलनावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेने लक्ष वेधले आहे. या सर्व क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत, असे एमपीसीच्या पत्रकार परिषदेत गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com