Fixed Deposits : 'ही' बँक वृद्धांना FD वर देत आहे जास्तीत जास्त नफा

Fixed Deposits : SBI, HDFC नाही, तर 'ही' बँक वृद्धांना FD वर देत आहे जास्तीत जास्त नफा
Senior citizens
Senior citizensdainik gomantak

Fixed Deposits : आपल्याला आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपण आपल्या पगारातील थोडिशी रक्कम ही बँकेत जमा करत असतो. नाहितर एखादी भिसीत ती गुंतवत असतो किंवा शेअर मार्केटमध्ये लावतो. पण आजही अनेक लोक आहेत जे सुरक्षित गुंतवणुक म्हणून Fixed Deposits कडे बघतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी (Fixed Deposits) हा एक चांगला पर्याय आहे. मुदत ठेवीवर बँकेकडून व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना सामान्यपेक्षा जास्त व्याज मिळतो. गेल्या काही वर्षांत मुदत ठेवींवरील परतावा कमी झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही ठेवींवर पूर्वीपेक्षा कमी परतावा मिळत आहे. (Senior citizens can earn additional 0.75% at Yes Bank)

SBI, HDFC, ICICI पेक्षा 0.75 टक्के अतिरिक्त व्याज दर

सध्या येस बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर सामान्य पेक्षा 0.75 टक्के अतिरिक्त व्याज दर देत आहे. एसबीआय (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आणि आयसीआयसीआय बँक (ICICI) यांसारख्या प्रमुख बँकांच्या तुलनेत येस बँक एफडीवरील व्याजदर जास्त आहे. विशेषत: 3 ते 7 वर्षांच्या मुदत ठेवींवर, बँकेकडून सर्वोत्तम परतावा मिळत आहे.

येस बँक (Yes Bank) ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 7 टक्के व्याज दर देत आहे. जे 6.25 टक्के या सामान्य दराच्या तुलनेत अतिरिक्त 0.75 टक्के आहे. त्याच वेळी, 7 दिवस ते 14 दिवसांच्या किमान कालावधीसाठी, वृद्धांना 3.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. जे सामान्य 3.50 टक्के दरापेक्षा 0.50 टक्के जास्त आहे.

Senior citizens
युपीआय, नेटबँकिंग वापरताना सावधान; हा व्हायरस करेल तुमचे बँक खाते रिकामे

इतर बँका :

दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी, SBI 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.95 टक्के व्याज दर देते. त्याचवेळी, 5 वर्षे आणि 10 वर्षांच्या कालावधीसाठी 6.30 टक्के दराने व्याज देत आहे.

एचडीएफसी बँक (HDFC) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवर (FD) ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) 6.35 टक्के व्याजदर देतात. हे व्याजदर 5 वर्षांवरील आणि 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही बँका 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीवर 5.95 टक्के दराने व्याज देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com