Amazon चे CEO पद सोडल्यानंतर जेफ बेझोस करणार काय?

मुख्य कार्यकारी अधिकारीपद (CEO) सोडल्यानंतर अ‍ॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) काय करेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.
CEO of Amazon
CEO of AmazonDainik Gomantak

अ‍ॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. जेफ बेजोसनंतर अँडी जॅसी (CEO Andy Jassy) हे अ‍ॅमेझॉनचे नवे सीईओ असणार आहे. अँडी जॅसी 5 जुलैपासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. जेफ बेझोस यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. (What will Jeff Bezos do after leaving Amazon's CEO position)

57 वर्षीय जेफ बेजोसनंतर अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी या कंपनीचे सूत्रे स्वीकारले. अँडी जॅसी 20 वर्षांपासून कंपनीची धूरा सांभाळत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद सोडल्यानंतरही जेफ बेझोस हे अ‍ॅमेझॉन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कायम राहतील.

CEO of Amazon
येणाऱ्या काळात वित्तीय तूट भरुन निघेल- Pinaki Chakraborty

मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडल्यानंतर जेफ बेझोस इतर अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कारण अ‍ॅमेझॉनचा संस्थापक आता निवृत्त झाल्यानंतर काय करेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पद सोडल्यानंतर जेफ बेझोस करणार काय?

जेफ बेझोस अवकाशात जाणार आहेत याची बर्‍यापैकी चर्चा झाली. यासाठी त्यांनी ब्लू ओरिजिनमध्ये (Blue Origin ) कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत जेणेकरुन अवकाश पर्यटन आणि पायाभूत सुविधांना चालना मिळेल. जेफ बेझोस यांनी याबद्दल प्रथम घोषणा केली होती की, ते ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड स्पेस कॅप्सूलमधून अवकाशात जाणार आहेत.

जेफ बेझोसने नुकताच ड्वेन 'द रॉक' जॉनसनबरोबर (Dwayne ‘The Rock’ Johnson) एक सेल्फी शेअर केला आहे. रिपोर्ट्सनुसार अ‍ॅमेझॉन स्टुडिओ आणि जॉन्सनची कंपनी सेव्हन बक्स प्रॉडक्शन या दोघांनीही या चित्रपटाच्या निर्मितीसाठी भागीदारी केली आहे.

CEO of Amazon
येणाऱ्या काळात वित्तीय तूट भरुन निघेल- Pinaki Chakraborty

जेफ बेझोस आता वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रावर देखील अधिक लक्ष देतील. त्यांनी 2013 मध्ये ही वृत्तपत्र कंपनी २$० दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती. याशिवाय ते समाज आणि मानवतेच्या विकासावरही लक्ष देणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com