WhatsApp Testing New feature : Snapchat च्या धर्तीवर 'व्हॉट्सअ‍ॅप'चं नवं फीचर; मेसेज लगेच होणार डिलिट

'व्ह्यू वन्स टेक्स्ट' फीचरची चाचणी सुरु
WhatsApp data leak
WhatsApp data leakDainik Gomantak

WhatsApp New Feature : व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपकडून युजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे नवे फीचर्स लॉन्च केले जातात. असाच एक नवा फीचर व्हॉटसअ‍ॅपने आणला आहे. व्हॉटसअ‍ॅप टेक्स्ट मेसेजसाठीही ‘व्ह्यू वन्स’ सुविधा आता उपलब्ध करणार आहे. काही दिवसांपुर्वी व्हॉटसअ‍ॅपने फोटोसाठी ‘व्ह्यू वन्स’ सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

WhatsApp data leak
Goa: रात्री 10नंतर म्युझिक बंदी; पर्यटन व्यवसायाच्या येणार मुळावर

व्हॉटसअ‍ॅपने फोटोसाठी ‘व्ह्यू वन्स’ ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यावर युजर्स खाजगी किंवा महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ शेअर करू लागले. ‘व्ह्यू वन्स’ सुविधेमध्ये समोरच्या व्यक्तीने फोटो किंवा व्हिडीओ मेसेज एकदा पाहिल्यानंतर तो पुन्हा पाहू शकत नाही. आपोआप डिलीट होतात. बीटा प्रोग्राममध्ये आवृत्ती 2.23.1.3 साठी नवीन अपडेट आणत आहे. या नवीन अपडेटमध्ये व्हॉटसअ‍ॅप तीन नवीन बिग हार्ट इमोजींवर काम करत आहे. तसेच जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्डिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून एक अ‍ॅप मोफत डाउनलोड करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही हे रेकॉर्डिंग डाउनलोड करून ऐकू शकता तसेच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.

WhatsApp data leak
Calangute : कळंगुटमध्ये छम छम सुरुच; आमदार लोबोंसह स्थानिक अ‍ॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, आता व्हॉटसअ‍ॅप टेक्स्ट मेसेजसाठीही ‘व्ह्यू वन्स’ सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. टेक्स्ट मेसेजिंगसाठी सुरु होणाऱ्या 'व्ह्यू वन्स’ सुविधेवर अजुन चाचणी सुरु असल्याने, ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध झालेली नाही आहे. व्हॉटसअ‍ॅप फीचर ट्रॅकर WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉटसअ‍ॅप 'व्ह्यू वन्स टेक्स्ट' मेसेज फीचरची चाचणी करत आहे. हे सध्या गुगल प्ले बीटा प्रोग्रामद्वारे व्हॉटसअ‍ॅप बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे. लवकरच व्हॉटसअ‍ॅपकडून 'व्ह्यू वन्स टेक्स्ट'साठी अपडेट येवू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com