अर्ज संस्थेच्या मदत सेवेला मोठा प्रतिसाद

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

अर्ज संस्थेच्या मदत सेवेला मोठा प्रतिसाद

तेजश्री कुंभार,

पणजी, 

अन्यायरहित जिंदगी म्हणजेच अर्ज या संस्थेने लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी कोविड रिलिफ सर्व्हिस नावाचे ऑनलाईन मदत केंद्र सुरू केले आहे. अर्जचे संस्थापक अरुण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशीच या सेवेचा लाभ ६० लोकांनी घेतला आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या जागतिक संकटात लोकांची मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ज्यांना एखाद्या गोष्टीबाबत मदतीची गरज आहे त्यांना ते ज्या भागात आहेत तेथे त्यांच्यापर्यंत मदत देऊ करणाऱ्या योग्य स्रोताला पोहचविण्याचे कार्य हा उपक्रम मदत करणारा आहे. ही मदत विभागीय, तालुका तसेच जिल्हानिहाय मदत केंद्रांबाबत माहिती देणार आहे.
देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडलेली मूळची बिहारची असणारी आणि सध्या मुंबई येथील रहिवासी असलेली महिला गोव्यात आहे. तिच्याकडे घरात जेवणाचे साहित्य आणण्यासाठी पैसे नसल्याचे तिने सांगितले. तिच्यासारखी समस्या असणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असल्याचे दिसून आल्यानंतर आम्ही ही सेवा सुरू केली. लॉकडाऊन असल्याने मदत हवी असेल त्यासाठी आणि आमच्यासाठी योग्य असा मध्यम मार्ग शोधला आणि ऑनलाईन उपक्रम सुरु केला.
हे कार्य विस्तारित असल्याने या कार्यासाठी मदत करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांना अर्जने संपर्क केला. यामध्ये काही संवेदनशील लोक, संस्था तसेच काही लोक जे गरजूंसाठी जागा वगैरे देऊ शकतात अशा लोकांचा समावेश
आहे.
ज्यांना या मदत केंद्राचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी http://covidrelief.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन अर्जने केले आहे. 

संबंधित बातम्या