अटल सेतू् अंशतः वाहतुकीस बंद

dainik gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

अटल सेतू् अंशतः वाहतुकीस बंद 

पणजी,

 मांडवी नदीवरील केबल स्टेड ‘अटल सेतू’ या तिसऱ्या पुलाच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याने मेरशी सर्कलकडून दिशेने जाणारा पुलाचा रस्ता अडथळे घालून आजपासून (२६ एप्रिल) वाहतुकीस अंशतः बंद करण्यात आला आहे. मात्र, या पुलाचा पर्वरी येथून मेरशी सर्कलकडे येणारा रस्ता वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काल आदेश जारी करून अटल सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी तो वाहतुकीस चार आठवडे लवकरच बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या आदेशानंतर आज तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्राधान्यक्रमाने सुरू करण्यात येणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर एक वर्ष उलटून गेले आहे. या एक वर्षाच्या काळामध्ये या पुलावरील रस्त्यावर काही ठिकाणी पॅचवर्क करण्याची गरज आहे. गेल्या पावसाळ्यात या रस्त्यासंदर्भातचे दोष दुरुस्त करण्यात येणार आहेत. पावसाळा एक महिन्यावर राहिला असल्याने त्याची ही दुरुस्ती तातडीने केली जाणार आहे. या पुलाच्या रँपच्या ठिकाणी रस्ता ठिकठिकाणी खचल्याने त्याचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाच्या रस्त्यावरही काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे लहानसहान खड्डे पडले आहेत तसेच खचण्याचे प्रकारही झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती तसेच असलेले दोष दूर करण्यासाठी हे काम त्वरित हाती घेतले जाणार आहे.
अटल सेतू हा मांडवी नदीवरील तिसरा पूल ज्या वाहन चालकांना पणजीत यायचे नाही त्यांना खूपच सोयीस्कर बनला आहे. त्यामुळे या वाहन चालकांना पणजीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होत होता तो आता कमी झाला आहे तसेच पणजीत वाहतुकीची जी कोंडी व्हायची ती सुद्धा काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र येत्या चार आठवड्यात मडगाव येथून पर्वरीकडे जाणारी वाहतूक आता पणजी बसस्थानकाच्या दिशेने सरकून मांडवी पुलावरून जाणार आहे. राज्याने लॉकडाऊन शिथिल करून बांधकाम सामानाच्या मालवाहू वाहनांना प्रवेश खुला केला आहे. त्यामुळे या पुलाबरोबरच सरकारचे इतर प्रकल्पाची कामेही पावसाळ्यापूर्वी होतील तेवढी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

 

संबंधित बातम्या