अफगाणिस्तान विद्यार्थ्याला मारहाण  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:दोनापावल येथे अफगाणिस्तानी विद्यार्थ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला
एकाला अटक जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू
दोनापावल येथील मणिपाल इस्पितळजवळ काल रात्री चौघा युवकांनी एका अफगाणिस्तानच्या गोवा विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले.याप्रकरणी पणजी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जखमी विद्यार्थ्यावर गोमेकॉ इस्पितळातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान विद्यार्थी मतिउरला अरिया (२४) हा गोवा विद्यापीठात एम. कॉम. अभ्यासक्रम शिकत आहे.त्याच्यात व संशयितांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.त्यानंतर या संशयितांनी अफगाणिस्तानी विद्यार्थ्याचा पाठलाग केला व त्याला गाठून हल्ला केला.करंझाळे येथील संशयित सतीश निलकंटे (२९) याला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध घेत आहेत.जखमी मतिउरला याची जबानी नोंद करण्यात आलेली नाही त्यामुळे त्याच्यावर कशाने हल्ला करण्यात आला याची माहिती अजून मिळालेली नाही.या घटनेची तक्रार विद्यापीठाचे संचालक अरुण त्रिपाठी यांनी पणजी पोलिसात दाखल केली आहे

पशुखाद्य दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय

संबंधित बातम्या