आसगाव येथे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

थिवी:बांदेकर महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

थिवी:बांदेकर महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती
गोव्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली असून या संपूर्ण आठवड्यात वाहतूक विभागातील पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमार्फत रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.गोव्यात दर दिवशी रस्ता अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो.अपघाताची कारणे वेगवेगळी असली तरी मुख्य कारण हे बेजबाबदारपणे वाहने हाकणे, दुचाकी चालवताना हॅल्मेट न वापरणे, गाडी चालवताना सिट बॅल्ट न घालणे, रस्त्यावरील अडथळे व खड्डे इत्यादी रस्ता सुरक्षा साप्ताहानिमित्त आज आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या बांदेकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यातर्फे अंजुने तसेच म्हापसा पोलिसांच्या सहकार्याने कॉलेज आवारातून आसगावपर्यंत रॅली काढण्यात आली.यात अंजूने वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरिक्षक वामन नाईक, हेड कॉन्स्टेबल बशिर मुल्ला (म्हापसा वाहतूक विभाग) इतर पोलिस कर्मचारी विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा विभागाचे प्रमुख प्रा. योगेश्‍वर भोसले सहभागी झाले होते.जनजागृती रॅलीची सुरुवात आज सकाळी कॉलेजच्या मुख्य प्रवेश द्वारापासून करण्यात आली.यात ज्या ज्या दुचाकी चालकांनी हॅल्मेटचा वापर तसेच चारचाकी चालकांनी सिट बॅल्टचा वापर केला होता.अशा विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना थांबवून त्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर ज्यांनी हॅल्मट परिधान केले नाही तसेच सिट बॅल्टचा वापर केला नाही त्यांना थांबवून हॅल्मेट व सिट बॅल्टचा वापर करण्याविषयी समज देण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या सभागृहात रस्ता सुरक्षा व अपघात टाळण्याविषयी कोणती काळजी घ्यावी व या विषयी उपनिरीक्षक वामन नाईक तसेच हेड कॉन्स्टेबल बशिर मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.प्रा. योगेश्‍वर भोसले यांनी स्वागत व मार्गदर्शकांची ओळख करुन दिली.

गोळावली वाघ मृत्‍यूप्रकरणी पाचही जणांना नवव्या दिवशी जामीन

संबंधित बातम्या