अॅक्सिस म्युच्युअल फंडचा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:एन्व्हॉयर्नमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स (ईएसजी) थीम या बाबतीत शाश्वत पद्धती अवलंबणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्याचे उद्दिष्ट असणारी ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे. अशा पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना जबाबदार पद्धतीने पैसे मिळवण्याची संधी देते.

पणजी:एन्व्हॉयर्नमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स (ईएसजी) थीम या बाबतीत शाश्वत पद्धती अवलंबणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्याचे उद्दिष्ट असणारी ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे. अशा पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना जबाबदार पद्धतीने पैसे मिळवण्याची संधी देते.
एनएफओ तारिख २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी आहे.त्यांना मिळणारे पर्यावरणीय, सामाजिक व नियमनात्मक प्रतिसाद आधीपेक्षा जलद आहेत आणि त्यामुळे व्यवसायासाठी मोठी आव्हाने निर्माण होत आहेत.परंतु, अनेक व्यवसाय त्यांचे कार्बन फूटप्रिंट किंवा वेस्ट एमिशन अशा अमूर्त स्वरूपातील खर्चांकडे दुर्लक्ष करून, मूर्त वित्तीय खर्च/फायद्यांचे विश्लेषण यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड
अॅक्सिस एएमसी उत्पादनामध्ये नावीन्य आणण्यात आणि गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन कामगिरी करण्याची क्षमता असणारी सक्षम गुंतवणूक प्रक्रिया निर्माण करण्यात नेहमी आघाडीवर राहिली आहे.दीर्घ कालावधीमध्ये व्यवसायात शाश्वत कामगिरी करू शकतील अशा गुंतवणुकींमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या नव्या उत्पादनांच्या मदतीने अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड या दोन्ही निकषांच्या बाबतीत आपल्याला पुढे घेऊन जातो. त्यामुळे अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड गुंतवणूकदारांना जबाबदारपणे पैसे मिळवण्याची संधी देणारे सोल्यूशन देणार आहे.
अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश कुमार निगम यांनी सांगितले, अॅक्सिस एएमसीमध्ये आमच्या मते, गुणवत्ता व शाश्वत वाढ यावरील आमचा मूलभूत भर विचारात घेता, ईएसजी हा आमच्या विचारसरणीचा तर्कशुद्ध विस्तार आहे.ईएसजी विश्लेषणाची सांगड पारंपरिक वित्तीय मेट्रिक्सशी घालून आम्ही आमच्या पोर्टफोलिओतील प्रत्येक कंपनीचे अधिक सर्वांगीण आकलन करू शकतो. अशा कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्याने अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंडाला गुंतवणूकदारांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण करता येईल, असे आम्हाला वाटते.

 

फोंडा येथील युवकाला अत्याचारप्रकरणी अटक

संबंधित बातम्या