राज्यात लवकरच मधमाशी पालन योजना

गोमन्तक विशेष
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:१०० प्रशिक्षित मधमाशीपालकांना मिळणार ७५ लाख रुपयांचे अनुदान

पणजी:१०० प्रशिक्षित मधमाशीपालकांना मिळणार ७५ लाख रुपयांचे अनुदान
केंद्रीय उद्योग, व्यापार आणि वाणिज्य विभाग गोव्यात मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. ७५ लाख रुपयांच्या वाटपासह ही योजना पुढील पाच वर्षांत किमान १०० प्रशिक्षित मधमाशीपालकांना अनुदान वाटप करणार आहे.परंतु सध्या राज्यात हळुवारपणे लोक मध उत्पादनाकडे वळू लागल्याची माहिती समोर आली आहे.मध उत्पादन म्हणजे मधमाशी पालन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.ही योजना मधमाशी पालन उद्योगाला चालना देण्यासाठी आहे.मधमाशांमुळे शेती उत्पादनात ३० टक्के वाढ होते आणि त्याशिवाय उत्पादक मध विकून आपले अर्थकारण सुधारू शकतो.केंद्र सरकारची ही योजना काही दिवसांत अमलात येईल. दरम्यान, गोव्याचा विचार केला तर मधमाशींचा उपयोग नारळ आणि सुपारी पिकाला पोषक असल्याचे दिसून आले आहे.सांगेतील मधमाशी पालन केंद्राचे भागीदार चिन्मय तानशीकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री असलेले विश्‍वजित राणे यांच्या मते मधमाशी पालन करणे आणि चाळी उभारण्यासाठी गरजूंना प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय उत्पादकांना मधाचे पॅकिंग करण्याचेही शिकविले जाईल.राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये महिला व शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षण देण्याची मोहीम सुरू केली.खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) यांच्या सहकार्याने महिला शेतकरी समूहांना या उपक्रमाचा महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जात आहे.
राज्यात या योजनेची अंमलबजावणी करणारी केव्हीआयसी ही एजन्सी काम करेल.सर्वसाधारण गटातील अर्जदार १०० मधमाशा व इतर उपकरणे खर्चाच्या ९० टक्के अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.अनुसूचित जाती/जमातीतील अर्जदार असल्यास त्यास ९५ टक्के अनुदान मिळणार आहे.मूल्यमापन समितीने सर्व अर्जदारांना अनुदान वितरण मंजूर केले आहे.कौशल्य विकासांतर्गत या योजनेसाठी सहकार्य केले जात आहे.त्यात तांत्रिक माहिती, गुणवत्ता नियंत्रण, प्रमाणपत्र आणि उप-उत्पादन प्रक्रियेसाठी ही योजना देखील सहाय्य करेल. केव्हीआयसीने मोरजी, जुने गोवे, डिचोली आणि दाभाळ येथील लोकांना मधमाशी पालनासाठी सुविधा दिल्या आहेत.

दाबोळी येथे मद्यविक्री परवाना देण्यास विरोध

गोव्यात कोणीच मधमाशी पालनाकडे वळले नव्हते, तेव्हा म्हणजे आठ वर्षांपूर्वी मिलिंद सप्रे, दत्तानंद प्रभुदेसाई आणि दिलीप सरदेसाई असे आम्ही चौघांनी मधमाशी पालनास सुरवात केली.कोणतेही प्रशिक्षण नसताना आम्ही या व्यवसायाकडे वळलो.तेव्हा कृषी अधिकारी दत्तप्रसाद देसाई यांनी आम्हाला केलेले मार्गदर्शन उपयोगी पडले.आजमितीला आमच्याकडे चार-चार जाळ्यांच्या १५ कॉलनी आहेत.सरासरी वर्षाला एका हंगामात एका कॉलनीतून ८ किलो मध उपलब्ध होतो.म्हणजे सर्व जाळ्यांमधून सरासरी ९५ ते ९६ किलो मध उपलब्ध होतो.या मधाला आजुबाजूच्या गावांतूनच अधिक मागणी असल्याने आम्हाला कोणतीही बाजारपेठ शोधावी लागली नाही.मधमाशांचा उपयोग नारळ आणि सुपारीच्या पिकासाठी फार झाला आहे. ३२ ते ३५ टक्के उत्पादनावर हा परिणाम होत असल्याचे निरीक्षणास आले आहे.

संबंधित बातम्या