बेंडवाडा सांगे पुलाचे काम रखडले

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

पुलाचे काम पुढील सहा महिने रेंगाळत पडणार असल्याचे नक्की झाले आहे. 

मनोदय फडते

सांगे

बेंडवाडा सांगे पुलाचे काम गेल्या मार्च अखेर पासून कोरोना संसर्गा मुळे राज्यात लागू केलेल्या संचार बंदी मुळे बंद पडल्याने आता संचार बंदी कधी उठविली जाईल ते सांगता येत नसल्याने पुढे येणाऱ्या पावसात काम करणे कठीण होणार असल्यामुळे बांधकाम कंत्राटदाराने तूर्त पुलाचे काम ऑक्टॉबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले असून संचार बंदीच्या दोन महिन्या साठी पुलाचे काम पुढील सहा महिने रेंगाळत पडणार असल्याचे नक्की झाले आहे. 

खूप वर्षांची मागणी पूर्ण होऊ लागल्याने सांगेवासीय खुश होते. कामाची सुरुवातही दमदार झाली होती. पावसाळ्या पूर्वी जोखिमेचे काम पूर्ण केले असल्यास पावसातही हळू हळू काम करता आले असते. नदीच्या दोन्ही बाजूला खांब उभे करण्यासाठी खुदाई करून काही खांब काँक्रीट घालून भरून काढले आहे. नदीच्या पात्रता खांबाची खुदाई सुरु करणे शिल्लक होते. ते अडचणीचे काम असल्याने संचारबंदी उठल्यानंतर काम हाती घेईपर्यंत पावसाळा सुरु होणार आहे. काम करण्यासाठी त्रासदायक होणार असल्याने कंत्राटदाराने काम बंद करून थेट पावसाळा ओसरल्या नंतर ऑक्टॉबर महिन्यात कामाला परत सुरुवात करण्याचा विचार केला आहे. 

काम करण्याच्या ऐन मोसमात संचार बंदीचा फटका बांधकामाला बसल्याने मजुरांना किती दिवस बसून ठेवणार. एक दोन मजूर असल्यास गोष्ट वेगळी पण यंत्र सामुग्री आणी मजुरांचा ताफा सांभाळणे कठीण जात असल्याने व पावसात कामाला जोर लावता येत नसल्याने पुढील किमान सहा महिने काम बंद करून इतर ठिकाणी काम करण्याचा निर्णय कंत्राटदाराने घेतला त्याचा फटका सांगे वासियांना बसणार आहे. 

 वास्तविक कंत्राटदाराने काम बंद न करता इतर कामे हाती घेतल्यास सहा महिन्यानंतर करणारी कामे आता हाती घेतल्यास पूल निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होईल या गोष्टीत सरकारने लक्ष घालूंन पावसाळ्यामुळे काम बंद न करता कंत्राटदाराने इतर कामना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. कारण एकदा प्रकल्प रखडल्यास परत तो मार्गी लागण्यास बराच विलंब लागणार असल्याने सरकारने बेंडवाडा सांगे येथील नवीन पुलाच्या बांदकामा कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या