मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांनो सावधान

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:मद्यप्राशन केल्याने चालकाला ३० दिवसांची साधी कैद
राज्यातील रस्ता अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.मद्यप्राशन करून वाहन चालविताना कारवाई झालेल्या अभिजीत देका या आसामच्या तरुणाला न्यायालयाने ३० दिवसांची साधी कैद ठोठावली आहे.त्यामुळे मद्यप्राशन केलेला वाहनचालक पोलिसांच्या तावडीत सापडल्यास त्याला तुरुंगाची हवा खाण्याची पाळी येणार आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.या वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यास वाहतूक खात्याकडे शिफारस करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल जाते.पणजी वाहतूक पोलिसांनी गेल्यावर्षी १८ डिसेंबर २०१९ रोजी अभिजीत देका याला मद्यप्राशन केल्याप्रकरणी कारवाई केली होती.कायद्यानुसार अशा गुन्ह्यात संशयिताला दंड तसेच तुरुंगाची शिक्षा आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना वचक बसावा म्हणून दंडात्मक कारवाईशिवाय तुरुंगवासाची शिक्षा होणे आवश्‍यक आहे, असे मत वाहतूक अधिकाऱ्याने व्यक्त केले.

संबंधित बातम्या