भाजपमुळेच अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत : संबित पात्रा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

बिघडलेली अर्थव्यवस्था भाजपनेच टिकवली : संबित पात्रा

संवादात्मक कार्यक्रमात बोलताना संबित पात्रा. सोबत माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, खासदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर.

पणजी : जागतिक स्तरावरीली आर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्था बिघडलेली असताना भारतातील अर्थव्यवस्था टिकविण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झाले आहे. भारत बदलत आहे २०२०-२१ या यावर्षासाठी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाने देशाला काय दिले, हे पटवून देताना संबित पात्रा यांनी बहुमताचे सरकार आल्यानंतरच अशक्य वाटणारे निर्णय कसे घेणे शक्य होते, हे सांगितले.

भाजपच्यावतीने येथील तारांकित हॉटेलमध्ये सायंकाळी राज्यातील विविध स्तरातील मान्यवरांशी आयोजित संवादात्मक कार्यक्रमात पात्रा बोलत होते. व्यासपिठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.

पात्रा म्हणाले की, २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून देशाने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. देशात होत असलेल्या कामामुळेच ते शक्य झाले आहे. यापूर्वी राजीव गांधी यांना इंदिरा गांधी यांच्या पश्‍चात सहानुभूतीची लाट मिळाली होती. तेव्हा काँग्रेसला अपेक्षेपेक्षाही मोठे बहुमत मिळाले होते, परंतु त्यानंतर काँग्रेसला तसे यश मिळाले नाही. नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतरच्या कामाच्या जोरावर २०१९ मध्ये पूर्वीपेक्षाही चांगले बहुमत मिळविले. या सरकारने कधी स्वप्नवत वाटत नसलेले निर्णय घेतले. जम्मू काश्‍मीरमधून ३७० कलम हटविले. त्याचा देशाला काय फायदा झाला हे स्पष्ट करीत पात्रा यांनी सांगितले की, मोदी सरकारने तिहेरी तलाक कायदा संपुष्टात आणला. त्याशिवाय १६० वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकेलला राम मंदिराचा वाद संपुष्टात आणला.

केंद्र सरकारची मागील २०१४ पासूनच्या कामगिरीचा आढावा घेत पात्रा यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प कसा चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत भारत १४४ व्या स्थानावर होता, पण आता तो ६३ व्या स्थानावर आला आहे. जागतिक बाजारपेठेत आर्थिक मंदी असला तरी देशातील अर्थव्यवस्था टिकविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. कार्पोरेट टॅक्स २५ वरून २२ ट्क्क्यांवर आणल्यामुळे या क्षेत्रात मोठी गुंतवणूक वाढली आहे.

देशात १०३ लाख कोटी रुपये पायाभूत विकासासाठी कर्च होणार आहेत आणि गोव्यात सुरू असलेली विकासकामे ही त्याची साक्षिदार आहेत. कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार १५ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. कृषी रेल्व आणि शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. देश विकसनशील देशांकडे वाटचाल करीत आहे. नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी युवा शक्ती महत्त्वाची असून, या शक्तीने देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, पात्रा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील वातावरण बिघडविण्याचा झालेल्या प्रयत्नावर त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्याचबरोबर दिल्ली शांत आहे आणि देश हा शांतताप्रिय असल्याचे सांगत गोव्यातील लोकांनी दिल्लीला फिरायला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपचे मंत्री

संबंधित बातम्या