राज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे : मुख्यमंत्री

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

डिचोलीः राज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे आहे. यापुढे विकासकामांबाबतीत सरकार सदैव तत्पर राहणार आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर दुर्बल आणि गरजवंत घटकांपर्यंत पोचण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वास आल्यानंतर जवळपास २० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेंत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी सरकार जिल्हा पंचायतीला भरीव सहकार्य करणार आहे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत यापुढे जिल्हा पंचायत सदस्यांना दरवर्षी १५ कोटी निधी उपलब्ध होणार आहे.

डिचोलीः राज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे आहे. यापुढे विकासकामांबाबतीत सरकार सदैव तत्पर राहणार आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर दुर्बल आणि गरजवंत घटकांपर्यंत पोचण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वास आल्यानंतर जवळपास २० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेंत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी सरकार जिल्हा पंचायतीला भरीव सहकार्य करणार आहे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत यापुढे जिल्हा पंचायत सदस्यांना दरवर्षी १५ कोटी निधी उपलब्ध होणार आहे. असे जाहीर केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीतील मये मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर यांच्या मये येथील प्रचार बैठकीत जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, मये जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर, मयेच्या सरपंच उर्वी मसूरकर, पंच सीमा आरोंदेकर, शंकर चोडणकर, तुळशीदास चोडणकर, विनीता गावकर आणि संतोष गडेकर उपस्थित होते.

मयेतील जनता सदैव प्रामाणिकपणे भाजपच्या पाठिशी उभी राहिली आहे. तेव्हा विकास आणि रोजगाराच्याबाबतीत मये मतदारसंघाकडे सरकार अजिबात दुर्लक्ष करणार नाही. या निवडणुकीतही मयेतील मतदार भाजपला साथ देवून शंकर चोडणकर यांना पुन्हा जिल्हा पंचायतीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणार आहेत असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्‍त करून भाजप कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले.

मये मतदारसंघातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चोडण येथील नियोजित पूल, मये येथे रेल्वेस्थानक आदी महत्वाचे प्रकल्प येत्या दोन वर्षात मार्गी लागणार, असा विश्वास आमदार प्रवीण झांट्ये यांनी व्यक्‍त केला. जिल्हा पंचायत निवडणुकीत मये जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त करुन कार्यकत्यांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी कार्यरत रहावे, असे आवाहन केले.

विकासासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार, असे शंकर चोडणकर यांनी सांगून कार्यकर्ते आणि मतदारांच्या विश्वासावर आपण निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्‍त केला. तुळशीदास चोडणकर आणि उर्वी मसूरकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले.
 

संबंधित बातम्या