चिंबल भागात जिलेटीन स्फोटचे प्रकार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पणजी: तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मामलेदारांना निर्देश
चिंबल येथील भागात खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर करून स्फोट घडवले जात आहेत.यासंदर्भात काँग्रेसने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिसवाडी मामलेदारांना याप्रकरणी तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.हे निवेदन दिल्यापासून याभागात स्फोट करण्याचे प्रकार बंद असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस युथ अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी दिली.

जिलेटीनचा वापर करून स्फोट घडवून आणले जात असल्याने चिंबल येथे राहत असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.या स्फोटामुळे हादरे बसत असल्याने त्यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या बेकायदेशीरपणे स्फोट घडवून आणलेल्या प्रकरणांना बंदी घालण्याचे निवेदन प्रदेश यूथ काँग्रेसने उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.याची दखल घेऊन अरितिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर यांनी तिसवाडी मामलेदारांना या प्रकरणाची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

चिंबल येथे खडीक्रशरसाठी जिलेटनचा वापर करून स्फोट घडविल्याने त्याची धूळ जवळच वस्ती असलेल्या घरांमध्ये येत आहे.तेथील काही घरांना या स्फोटामुळे तडेही गेले आहेत.या स्फोटामुळे होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे चिंबलवासियांचे जीवन विस्कळीत झाले आहे.त्यांना जीव मुठीत घेऊन घरांमध्ये राहावे लागत आहे.यापूर्वीही काही वर्षापूर्वी हे प्रकार सुरू करण्यात आले होते तेव्हा त्याची तक्रार दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ते बंद केले होते.पुन्हा त्याच भागात खडीक्रशरसाठी, खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर करण्याचे प्रकार सुरू आहेत.चिंबल पंचायतीने कोणताच परवाना या खडीक्रशरसाठी दिलेला नाही.त्यामुळे यासंदर्भात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.

चिंबल परिसरात खडक फोडण्यासाठी स्फोट घडवून आणले जात असल्याची चौकशी त्वरित करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी दिले होते.त्यानुसार त्यांनी या प्रकरणाची तपासणी करून तिसवाडी मामलेदारांकडे अहवाल मागविला आहे.

नवेवाडे येथे कुत्र्याला विष घालून मारण्याचा प्रकार

संबंधित बातम्या