अंधत्वाचे बंध दिले झुगारुन

Blind coconut plucker
Blind coconut plucker

तुकाराम गोवेकर
नावेली

 माणसाच्या अंगात जिद्दद, चिकाटी व आत्मविश्‍वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही. अशक्‍य ते शक्‍य बाळ्ळी देवाबाग येथील दिनेश कुशाली नाईक (६२) यांनी करून दाखवले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांना डोळ्यांचा आजार जडल्याने अंधत्व आले. पण त्यावर मात करून आपले दैनंदिन विधी, इतर सर्व कामे स्वत: करतात हे विशेष.
दिनेश नाईक यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या. त्यातला मजेशीर किस्सा म्हणजे ते स्वत: माडावर काजू, आंबा, फणसाच्या झाडावर चढून काजु, आंबे, नारळ, फणस काढतात. आजही ते फणसाच्या झाडावर व माडावर चढून नारळ काढतात. बालपणातच त्यांना शहाळे (आडसर) खायचा छंद होता. त्यामुळे त्यांना माडवर चढण्याची सवय लागली आणि नंतर गावातील आजूबाजुचे लोक त्यांना माडावर चढायला बोलवायचे. गणेश चर्तूथीच्या वेळी माडावरून नारळ अलगद काढून देत व आजही वयाची ‘साठी’ ओलांडली तरी माडावर झाडावर चढतात. ते कधीच शाळेत गेले नाहीत तर कधी शाळेची पायरीही चढले नाहीत. माडावरून आडसर काढल्या नंतर ती स्वत: कापून देतात.
दोनवेळा फणसाच्या झाडावरून पडले असे ते सांगतात. एकवेळा तर चक्क सुमारे १२ ते १५ फुट उंचावरून फणसाच्या झाडावरून खाली पडले. त्यांना डॉक्‍टरजवळ नेण्यात आले. पण याची त्यांना जरा सुध्दा कल्पना नव्हती. ज्यावेळी त्यांना शुध्द आली त्यावेळी त्यांना कळाले.
ते स्वत: प्रसिद्ध नामवंत गायक किशोर कुमार व कुमार शानू यांचे ते खुप चाहते आहेत, त्यांनी गायिलेली सर्व गीते ते गाऊन दाखवतात. किशोर कुमार यांची ‘कोरा कागज था ये मन मेरा लिख लिया नाम उसपे तेरा’, ‘ये शाम मस्तानी मद होश किए जाय मुझे डोर कोई खिंचे तेरी ओर लिए जाय’, कुमार सानू यांचे ‘आँख है भरी भरी और तुम मुस्कूराने की बात करती हो’ अशी गीते गातात. दिनेश नायक यांना क्रिकेटची खुप आवड आहे. टी.व्ही. येण्याअगोदर ते रेडीओ कानाला लाउन क्रिकेट समालोचन ऐकत असत. आजही ऐकतात, पण भारताने विश्‍वकप गमावल्याने आता काही प्रमाणात ते क्रिकेट समालोचन ऐकत नाहीत. त्यांना सर्व क्रिकेटरची नावे तोंडपाठ आहेत. नामवंत क्रिकेटर सचिन तेंडूलकर हे त्यांच्या खुप आवडीचे क्रिकेटर आहेत तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आवडीचे पंतप्रधान असल्याचे सांगतात. कारण त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले असे ते सांगतात.
गर्दीश मे तारे, ना घबराना प्यारे
तर तू हिंम्मत ना हारे
ना होंगे वारे न्यारे

ते स्वत: चुलीवर जेवण बनवतात. स्वत: चुलीत आग पेटवतात. घरात लाकडे नसतील तर ते रात्री अपरात्री जवळच्या जंगलात जाऊन लाकडे गोळा करून आणतात. ते म्हणतात मला सवय आहे. आग पेटते की नाही हे हात घालून पहातात. ते स्वत: कोयत्यावर तसेच कुंबळ्यावर नारळ सोलतात. त्यांच्याजवळ कितीही नारळ द्या ते सोलून देतात. त्यांना बालपणापासून पोहायचा छंद आहे. नदीवर जाऊन ते आजही आंघोळ करतात. घरात तसेच घराच्या सभोवताली कुणाचीही मदत न घेता फिरतात. घरापासून जवळच असलेल्या भरणीपांटो नदीवर जाऊन आंघोळ करतात. स्वत:चे कपडे स्वत: धुतात, आपली स्वत:ची कामे स्वत: करतात.
बाळ्ळी अडणे पंचायतीचे स्थानिक पंच सदस्य राजू गोसावी यांनी त्यांच्याविषयी अनेक किस्से सांगीतले. त्याच्या बद्दलच्या जुन्या आठवणी सांगितल्या, दिनेश ही आमच्या वाड्यावरची हुशार व्यक्ती आहे. त्यांनी अनेकांना पोहायला देखील शिकवले. काहीवर्षा पूर्वी शेजारच्या घराला रात्रीच्या वेळी आग लागली होती, त्यावेळी आजच्या सारखी पाण्याची वेवस्था नव्हती. दिनेश यांनी स्वत: भरणीपांट्यावरून पाणी आणून आग विझवली असे गोसावी सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com