'सशस्त्र क्रांतीचे जनक' वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी

'सशस्त्र क्रांतीचे जनक' वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी
17th February is the death anniversary of Father of Indian Armed Revolution Vasudev Balwant Phadke

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले क्रांतिकारक असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचं 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर जन्मलेले वासुदेव बळवंत फडके हे एका अत्यंत सामान्य कुटुंबातील होते. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरधोन गावात झाला. लहान असताना त्यांना कुस्तीची फार आवड होती.लहानपाणापसूनच अध्ययनात चपळ असल्याने त्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुण्यातच लष्करी खाते विभागात लिपिक म्हणून नोकरीत रूजू झाले.

ब्रिटीश राजवटी दरम्यान फडके हे शेतकरी समाजाच्या दुर्दशाने निराश झाले होते. त्यांचा असा विश्वास होता की ‘स्वराज्य’ हाच या आजारावरील उपाय आहे. भारताला स्वराज्य मिळावे याकरिता राजकीय प्रचारासाठी दौरा करणारे ते पहिले भारतीय होते.1875 मध्ये त्यांनी ब्रिटीशांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल आणि धनगर समाजाच्या मदतीने रामोशी नावाच्या एक क्रांतिकारक गटाची स्थापन केली. 20 फेब्रुवारी 1879 रोजी फडके यांनी आपले सहकारी विष्णू गद्रे, गोपाळ साठे, गणेश देवधर आणि गोपाळ हरी कर्वे यांच्यासह पुण्यापासून आठ मैलांच्या उत्तरेला असणाऱ्या लोणी गावाबाहेर 200 तरूणांचं बलवान सैन्य दलाची स्थापना केली. बहुधा ही भारताची पहिली क्रांतिकारक सेना होती. त्यांच्या सशस्त्र संघर्षासाठी निधी गोळा करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फडके आणि त्यांच्या साथीदारांनी एका श्रीमंत इंग्रजी व्यावसायिकावर छापा टाकला होता.

मे 1879 मध्ये त्यांनी सरकारच्या शोषणात्मक आर्थिक धोरणांचा निषेध करीत यांनी आपलं प्रसिद्ध घोषणापत्र जारी केली आणि ब्रिटीश सरकारला चेतावणी दिली. या घोषणेच्या प्रती राज्यपाल, जिल्हाधिकारी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांना पाठविल्या गेल्या आणि देशभरात एकच खळबळ उडाली. फडके यांनी एकदा ब्रिटीश सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवस संपूर्ण पुणे शहराचा ताबा मिळवला होता. या घटनेमुळे ब्रिटीशांना त्यांच्या ताकदीची जाण होऊन,वासुदेव बळवंत फडके म्हणजे नक्की कोण, हे त्यांना कळालं. 1860 मध्ये फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे या तीन समाज सुधारक आणि क्रांतिकारकांनी पूना नेटिव्ह संस्था स्थापन केली, जी सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते.

नंतर जेव्हा इंग्रजांनी देशावर त्यांची पकड घट्ट केली तेव्हा त्यांना महाराष्ट्र सोडून जावे लागले. ते आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीशैला मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले. ब्रिटिश सरकारची कार्यालये असलेल्या पुण्यातील दोन पेशवे वाड्यांना फडके यांनी आग लावली तेव्हापासून ब्रिटीश फडकेंवर छापा टाकत होते. 1879 मध्ये फडके यांना ताब्यात घेण्यात ब्रिटीशांना यश आलं आणि त्यांना मेनमधील अडेन येथील तुरुंगात हलवलं गेलं, कारण ब्रिटिशांना त्यांच्या अटकेबाबत भारतीय लोकांच्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती. फेब्रुवारी 1883 मध्ये त्यांनी तुरुंगाचे दरवाजे तोडून तुरुंगातून स्वत:ची सुटका केली, पण त्यांना ताबडतोब पुन्हा अटक करण्यात आली.त्यानंतर ब्रिटीशांना विरोध म्हणून त्यांनी आमरण उपोषण पत्करले आणि अखेर 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांचं निधन झालं तेव्हा ते अवघ्या 38 वर्षांचे होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com