Air Marshal from Goa : एअर मार्शल झालेले दोन मूळचे गोमंतकीय

मडगाव येथील एअर मार्शल संदेश प्रभाकर वागळे आणि मूळचे गणपोगा-राय येथील व नंतर मडगावला स्थायिक झालेले एअर मार्शल लोरेटो पेस्तन परेरा यांनी गोमंतकीयांची मान उंचावली आहे.
Air Marshal from Goa
Air Marshal from GoaDainik Gomantak

Air Marshal from Goa : मूळचे गणपोगा-राय येथील व नंतर मडगावला स्थायिक झालेले एअर मार्शल लोरेटो पेस्तन परेरा, पीव्हीएसएम (निवृत्त) दि. 4 नोव्हेंबर 1945 रोजी आयएएफच्या लॉजिस्टिक शाखेत नियुक्त झाले. 1955 च्या उत्तरार्धात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून त्यांची पदोन्नती झाली आणि नवी दिल्लीतील हवाई मुख्यालयात त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले. 1959 साली त्यांना स्क्वॉड्रन लीडर म्हणून बढती मिळाली आणि ते एका ग्रुपमध्ये होते.

1968 साली विंग कमांडर म्हणून पदोन्नती झाल्यावर ते लंडनमध्ये उप-हवाई-सल्लागार होते (1967-70). एअर व्हाईस मार्शल म्हणून ते हवाई मुख्यालयात सहाय्यक चीफ ऑफ स्टाफ, लॉजिस्टिक होते.

पीव्हीएसएमने नमूद केल्याप्रमाणे, ‘नवीन शस्त्रास्त्र प्रणालीच्या समावेशाशी संबंधित यशस्वी लॉजिस्टिक नियोजनात एअर व्हाइस मार्शल परेरा यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सक्षम आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे एचटी-2 विमानाचा उच्च सेवाक्षमता दर अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटच्या क्षेत्रात, त्यांनी केवळ प्रचलित योजनांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या नाहीत तर नवीन आणि उत्तम पुरवठा संस्था आणि कार्यपद्धती विकसित करण्यासाठी वेगळ्या विचारांचा आणि नावीन्यपूर्ण कौशल्यांचा प्रभावीपणे वापर केला. यातील सर्वांत लक्षणीय बदल म्हणजे धोरणात्मक बाबींसाठी जास्तीत जास्त चांगले व्यवस्थापन; दुरुस्ती एजन्सी आणि ऑपरेशनल युनिट्स दरम्यान रोटेबल्सचा थेट पुरवठा आणि परतावा प्रस्थापित केला. कुशल नेतृत्व, वैचारिक क्षमता आणि कर्तव्याप्रति समर्पित वृत्ती कायम दृगोचर झाली आहे. एअर व्हाइस मार्शल लोरेटो पेस्तन परेरा यांनी अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्ट प्रकारची विशिष्ट सेवा प्रदान केली आहे.’

दि. 30 एप्रिल 1985 रोजी ते सेवानिवृत्त झाले आणि बंगळुरू येथे आपल्या कुटुंबासह स्थायिक झाले. दि. 13 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचे निधन झाले.

मडगाव येथील एअर मार्शल संदेश प्रभाकर वागळे, व्हीएम (सेवा) यांना दि. 21 डिसेंबर 1984 रोजी उड्डाण शाखेत (हेलिकॉप्टर) नियुक्त करण्यात आले. त्यांच्याजवळ 5,400 तासांहून अधिक अपघातमुक्त उड्डाण करण्याचा अनुभव आहे. 2003 पासून ते फ्रंटलाइन अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते. अत्याधुनिक उपकरणांसह विमानाचे आधुनिकीकरण होत असताना एका महत्त्वाच्या क्षणी त्यांनी स्क्वॉड्रनची कमान सांभाळली.

स्क्वॉड्रनमधील उच्च तंत्रज्ञान सहज आणि जलद आत्मसात केल्यामुळे त्यांची आकलनशक्ती, कौशल्य आणि नेतृत्व दिसून आले. जगातील सर्वात प्राणघातक हल्ला करणारे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी आवश्यक असलेल्या अचूक मानकंनापर्यंत त्यांनी स्क्वाड्रनला आणले.

Air Marshal from Goa
Air Chief Marshal Hrushikesh Moolgavkar : मूळचे गोमंतकीय असलेले एकमेव हवाईदल प्रमुख

काँगोमध्ये यूएन मिशनवर स्क्वॉड्रनमधील टूल्स आणि परीक्षकांना पाठवण्यात आले, तेव्हा देखभालीच्या विविध समस्या सोडवण्यामागे त्यांचा प्रमुख हात होता. उणीवा दूर सारून विमानाची उच्च सेवाक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवीन कल्पना त्यांनी मांडल्या व त्या 100 % यशस्वी ठरल्या. त्यांच्या स्क्वॉड्रनला आयएएफचे ‘सर्वोत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन’ म्हणून घोषित करण्यात आले, त्यामागे त्यांच्या नवकल्पना आणि नेतृत्व कौशल्य होते, याबाबत वाद नाही.

आयपीकेएफ तैनातीदरम्यान त्यांनी ओप मेघदूतमधून आणि श्रीलंकेत सियाचीन ग्लेशियरमध्ये मोठ्या प्रमाणावर उड्डाण केले. ते आयएएफमधील सर्वांत तरुण एअर कमोडोर होते (पदोन्नती मिळाली तेव्हा त्यांचे वय 43 होते), आणि 2005 सालीही विंग कमांडर असताना कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना व्हीएम देण्यात आले होते.

एअर मार्शल म्हणून, ते एकात्मिक संरक्षण कर्मचारी (डॉक्ट्रीन, ऑर्गनायझेशन आणि ट्रेनिंग) चे उपप्रमुख आहेत. त्यांची पत्नी, ग्रुप कॅप्टन जिवेक्षा वागळे, ज्यांनी गोवा मेडिकल कॉलेजच्या 1985 च्या बॅचमधून एमबीबीएसमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यादेखील आयएएफच्या वैद्यकीय शाखेत काम करतात. एअर मार्शल वागळे हे मडगाव येथील प्रभाकर आणि शांता वागळे यांचे पुत्र आहेत. ग्रेस चर्चच्या मागे असलेले त्यांचे वडिलोपार्जित घर, आता एका उंच इमारतीने व्यापले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com