अस्थमा रुग्णांनी अधिक काळजी घ्या

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

कोरोना हा फुफ्फुसे व श्वसन प्रक्रियेवर आक्रमण करत असल्यामुळे अस्थमा म्हणजेच दम्याचा विकार असलेल्या रुग्णांनी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या अस्थमा दिनाचा (World Asthma Day) हाच खरा संदेश आहे.

सध्या सगळीकडे कोरोना महामारीची चर्चा आहे. याभरात इतर आजार बाजूला जाऊन पडलेले आहेत‌. मात्र, कोरोना हा फुफ्फुसे व श्वसन प्रक्रियेवर आक्रमण करत असल्यामुळे अस्थमा म्हणजेच दम्याचा विकार असलेल्या रुग्णांनी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या अस्थमा दिनाचा (World Asthma Day) हाच खरा संदेश आहे.(Asthma patients should be more careful)

जागतिक अस्थमा दिन हा दम्याच्या विकाराविषयी जागृती करण्याच्या आणि त्याच्याविषयीच्या गैरसमजुती निकालात काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. त्यानुसार यंदा हा दिवस आज 4 रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाच्या अस्थमादिनाची संकल्पना ही दम्याविषयीच्या गैरसमजुतींचा उलगडा करणे अशी आहे. 

त्या तिन्ही प्रकल्पावरून गोवा- भाजप सरकार तोंडघाशी

दम्याच्या विकाराविषयी आजही अनेक गैरसमजुती असल्याचे दिसून येते. ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा’ (Global Initiative for Asthma ) यांच्यानुसार ज्या सर्वसामान्य गैरसमजुती दिसून येतात त्यामध्ये अस्थमा हा केवळ मुलांना होतो आणि तो वाढत्या वयाबरोबर ठीक होतो. अस्थमा हा संसर्गजन्य विकार आहे. त्या रुग्णांनी व्यायाम करू नये. अस्थमा केवळ स्टेरॉइड्सचे (Steroid) मोठे डोस देऊन ठीक केला जाऊ शकतो या गैरसमजुतींचा समावेश होतो.

जागतिक अस्थमादिन हा ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा’ (Global Initiative for Asthma) यांच्या पुढाकारानेच साजरा केला जात आहे1998 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. दम्याच्या विकाराविषयीच्या एका अहवालाप्रमाणे, प्रत्येक दिवशी या विकारामुळे एक हजार लोकांचा मृत्यू होतो आणि जगभरात सुमारे34 कोटी लोक त्याने ग्रस्त आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याचा विकार असलेल्यांनी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यांनी आर्टिफिशियल स्वीटनर, रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, व्हेजिटेबल ऑईल टाळायला हवे तसेच शक्य तितके तळलेल्या पदार्थांपासून दूर राहायला हवे. अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि मुद्रा अभ्यास फायदेशीर ठरू शकतो.

नामवंत नाट्यकलाकार, नाट्यदिग्दर्शक रंजन मयेकर कालवश

कोरोना संसर्ग झाल्यास धोका

दम्याच्या विकारात आपल्या फुफ्फुसांशी जोडलेल्या श्वासनलिका या आपोआप बारीक होत असतात. त्यामुळे श्वास घेतला तरी तो नीट आत जाऊ शकत नाही आणि आपली दमछाक होऊ लागते. दम्याचा विकार आधीच फुफ्फुसे खराब करून टाकत असतो आणि कोरोनाही फुफ्फुसांनाच बाधा पोहोचवत असतो. त्यामुळे दम्याचा विकार असलेल्यांना कोरोनापासून जास्त धोका संभवतो आणि त्यांनी या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्यायला हवी, असे डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

दम्याचा विकार असलेल्यांनी कोरोनापासून स्वतःला अधिक जपायला हवे.‌ त्यांनी नियमित औषधे घ्यायला हवीत व इतरांकडे जाणे टाळावे तसेच बाहेर जाणेही शक्य असेल तितके टाळावे. धूळ असलेल्या जागी वा इतर त्रास होऊ शकणाऱ्या ठिकाणी गेल्यास दम्याचा विकार बळावू शकतो. अशा स्थितीत कोरोना झाल्यास आणखी जास्त त्रास होऊ शकतो हे डॉ. हेगडे यांनी नजरेस आणून दिले. अर्थात कोरोनाचा संसर्ग झालेला दम्याचा रुग्ण उपचारांनी ठीक होऊ शकतो, पण कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झालेला आहे, तो तीव्र झालेला आहे की कमी यावर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले.

- अंकिता गोसावी

 

संबंधित बातम्या