सुंदर साजरा श्रावण

विजयसिंह आजगांवकर
मंगळवार, 28 जुलै 2020

वैशाख वणव्याने होरपळलेली धरती ज्येष्ठ-आषाढात धुवांधार पावसाने थंड होते. पावसात सर्वत्र ढगाळलेले वातावरण असते. काही वेळेला संततधार पावसाने मन विषष्ण होते. मोकळेपणाने फिरता येत नाही. थोडेसे बंदिस्त राहिल्यासारखे वाटते, पण श्रावण येताच मन मोकळे होते.

 

विजयासिंह आजगावकर

श्रावणातला पाऊसच वेगळा असतो. मानवी भावभावांचा कोमलपणा जपणारा हा पाऊस सर्वत्र सृष्टीत अनुपम सौंदर्याचा आविष्कार घडवतो. सगळीकडे वृक्षवल्ली, फुले-पाने सुहास्य मुखाने डोलत असतात. वसुंधरा जणू हरित शाल लपेटून प्रपंचाची स्वप्ने पाहात असते. श्रावणातील ऊन तर बघायलाच नको. जणू काय हे ऊन धरतीला मुलायम स्पर्श करत असते. आभाळ क्रीडा करण्यासाठी खूणावत असते.

श्रावणमास म्हणजेच सर्वत्र हिरव्या रंगांची उधळण करत रोमारोमांत चैतन्य फुलवणारा मराठी महिन्यातील पाचवा महिना. या महिन्यात पशु-पक्ष्यांत, प्राण्यांत, पानाफुलांत सर्वत्रच चैतन्य ओसंडून वाहत असते. दाही दिशांना विविध छटा उमटलेल्या दिसतात. या रंगछटांतून जणू सर्जनतेचा साक्षात्कार घडत असतो.
वैशाख वणव्याने होरपळलेली धरती ज्येष्ठ-आषाढात धुवांधार पावसाने थंड होते. पावसात सर्वत्र ढगाळलेले वातावरण असते. काही वेळेला संततधार पावसाने मन विषष्ण होते. मोकळेपणाने फिरता येत नाही. थोडेसे बंदिस्त राहिल्यासारखे वाटते, पण श्रावण येताच मन मोकळे होते. आपल्याला एक प्रकारचा दिलासा मिळतो. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू असल्यागत सर्वत्र भासू लागते. हे सर्व पाहून प्रत्येकाचेच मन हरपून जाते. काहींना काव्य करण्याची स्फुर्ती येते. श्रावणातील पावसाचे वर्णन बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी सुंदर शब्दात केलंय. ते म्हणतात,
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुन ऊन पडे
श्रावणातला पाऊसच वेगळा असतो. मानवी भावभावांचा कोमलपणा जपणारा हा पाऊस सर्वत्र सृष्टीत अनुपम सौंदर्याचा आविष्कार घडवतो. सगळीकडे वृक्षवल्ली, फुले-पाने सुहास्य मुखाने डोलत असतात. वसुंधरा जणू हरित शाल लपेटून प्रपंचाची स्वप्ने पाहात असते. श्रावणातील ऊन तर बघायलाच नको. जणू काय हे ऊन धरतीला मुलायम स्पर्श करत असते. आभाळ क्रीडा करण्यासाठी खूणावत असते.
याच महिन्यात माणसाला ईश्वर भक्ती करण्याची प्रेरणा मिळते असे म्हटल्यास वावगे वाटू नये. याचमुळे श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्ये, उपासतापास, देवदर्शन, विविध सण यांच्याशी निगडीत झालेला दिसून येतो. याच महिन्यात आपण शीतला सप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा करतो. ब्राह्मणांचा यज्ञोपवीत बदलण्याचा उत्सव, बंधुभगिनींचा रक्षाबंधनाचा सण तसेच व्यापारी लोकांचा समुद्र पूजनाचा उत्सव सर्वांचीच मने प्रफुल्लीत करणाऱ्या याच उल्लासित महिन्यात येतो.
असा हा चैतन्यदायी प्रेरणादायी श्रावणमास. मनामनात, रोमारोमांत परमानंदाची बरकत आणणारा महिना. श्रावण म्हणजे सृष्टीची जणू किमयाच. आषाढातल्या कुंद वातावरणानंतर हळूच डोकावणारा हा श्रावणमास कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांना हसरा व लाजरा वाटतो. ते आपल्या एका कवितेत म्हणतात.
‘सुंदर साजरा श्रावण आला’ सृष्टीत सर्वत्र चैतन्य फुलवणाऱ्या व आध्यात्मिक प्रेरणा देणाऱ्या श्रावणमासाला यावर्षी कोरोनाचे ग्रहण लागले असले, तरी हाच स्फूर्तिदायी महिना नक्कीच आपणा सर्वांचेच मनोबल वाढवेल अशी आशा करुया.

संपादन हेमा फडते

 

संबंधित बातम्या