चला स्वदेशी बनू या...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अतिशय निम्न गुणवत्तेच्या फटाके, प्लॅस्टिकची खेळणी, तसे अनेक चीनी वस्तू ह्या आरोग्याला तसेच पर्यावरणाला धोकादायक आहेत. भारतात वस्तू घडविताना नाविन्यपूर्ण प्रयोगांवर आणि संशोधनावर भर दिला जातो. तर चीनमध्ये इतर देशातील नाविन्यापूर्ण वस्तूंची नकल करून बहुतेक वस्तू बनवल्या जातात आणि म्हणूनच चीनी वस्तू स्वस्त तर भारतीय वस्तू काही प्रमाणात महाग असतात. या वस्तूंवर बंदी म्हणजे साहजिकच आपल्याला जास्त किंमतीचा माल विकत घ्यावा लागतो आणि सध्या बाजारात हीच स्थिती आहे.

प्राची नाईक

दिवाळी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. महामारीमुळे आपले सण साजरे करण्यावर अनेक निर्बंध आहेत. यंदा अगदी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी होईल तरी आपले दिवे पेटवणारच ना कारण हा सणच दिव्यांचा...

भगवान राम वनवासातून परत आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही दिवे पेटवतो पण मागील काही वर्षांत आपले मातीचे दिवे हळू हळू दूर होत आहेत ज्यांची जागा चिनी लाइट्सने घेतली आहे. 

भारतातील जवळपास ११ कोटी लोकांचे जीवन लघु उद्योग, मध्यम उद्योग, कुटीर उद्योग उदा. लहान मुलांची खेळणी, दिवे, फटाके इ. यावर अवलंबून आहे. चीनमधून येणाऱ्या स्वस्त मालाचा फटका या सर्वांना मोठ्या प्रमाणात बसला आहे हे सर्वज्ञात आहे.

अतिशय निम्न गुणवत्तेच्या फटाके, प्लॅस्टिकची खेळणी, तसे अनेक चीनी वस्तू ह्या आरोग्याला तसेच पर्यावरणाला धोकादायक आहेत. भारतात वस्तू घडविताना नाविन्यपूर्ण प्रयोगांवर आणि संशोधनावर भर दिला जातो. तर चीनमध्ये इतर देशातील नाविन्यापूर्ण वस्तूंची नकल करून बहुतेक वस्तू बनवल्या जातात आणि म्हणूनच चीनी वस्तू स्वस्त तर भारतीय वस्तू काही प्रमाणात महाग असतात. या वस्तूंवर बंदी म्हणजे साहजिकच आपल्याला जास्त किंमतीचा माल विकत घ्यावा लागतो आणि सध्या बाजारात हीच स्थिती आहे. अनेक दुकानदार अगदी सरळपणे सांगतात की स्वस्त चिनी माल येणे बंद झाल्याने महाग वस्तूंशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. बदल असाच घडत नाही, तो आम्हीच घडवायचा असतो. ''मेक इन इंडिया''च्या अंतर्गत आम्ही हा बदल आणू शकतो. गेल्या वर्षी दिवाळीत हैदराबादमधील नागरिकांनी पारंपरिक मार्गाने जाऊन आणि स्वस्त चिनी लाईट्सपेक्षा चिकणमातीचे दिवे व पणत्या घेणे पसंत केले. वरून नागरिकांनी खरेदी करण्यापूर्वी ते भारतात तयार केले आहेत का हे देखील पडताळून पाहिले. त्याव्यतिरिक्त, छोट्या आरशांनी सुशोभित केलेल्या गुजरातच्या राजकोटमध्ये बनवलेल्या आकर्षक दिसणाऱ्या कागदाच्या कंदिलांनाही बाजारात मोठी मागणी आहे. त्यासोबत या दिवसांत पावलोपावली लघु उद्योग सुरू केले जात आहेत. कंदील, दिवे तयार करणाऱ्यांमध्येही भर पडली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात काही चिनी गोष्टींवर बंदी घालण्यात आली. पण संपूर्णपणे चिनी वस्तूंवर आपण सरसकट बंदी घालू शकतो का? तर नाही, कारण आपण जागतिक व्यापारी संघटनेचे सदस्य आहोत. त्यांच्या नियमाप्रमाणे आपण कोणत्याही देशाचा व्यापार असा सहज बंद करू शकत नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीने या सामानांवर बहिष्कार जरूर घालू शकतो. बहिष्काराचे लगेचच परिणाम जाणवत नाहीत परंतू दुरगामी परिणाम जरूर होतील. अंधारावरील प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवे पेटवले जातात आणि अशा वेळेस आपण स्वदेशी माल विकत घेऊन अनेक गरिबांच्या घरात आशेची पणती पेटवू शकतो, नवीन उद्योगांना पाठबळ देवू शकतो.

संबंधित बातम्या