छत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 10 मे 2021

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना गड कोटांच्या माध्यमांतून केली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गड हा त्यापैकी एक आहे. दुर्लक्षित राहिल्याने तो ठिकठिकाणी ढासळून गेल्याचे चित्र तेथे पाहायला मिळते.

गोवा वेल्हा: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना गड कोटांच्या माध्यमांतून केली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गड हा त्यापैकी एक आहे. दुर्लक्षित राहिल्याने तो ठिकठिकाणी ढासळून गेल्याचे चित्र तेथे पाहायला मिळते. या गडाचे संवर्धन व छत्रपती शिवाजी महारांजाचे स्मारक उभारण्याचा स्तुत्य संकल्प सोडला असून ते पर्यटकांचे आकर्षण ठरणार असल्याची माहिती येथील गडसेवकांनी या प्रतिनिधीला येथील एका भेटीत दिली. सध्या कोविड महामारीमुळे काम बंद आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj used to Survey Goa and Konkan from Hanumantha fort)

युवा गडसेवक वैभव आईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडवकालीन असलेला हा ऐतिहासिक गड नामशेष होण्याच्या मार्गावर होता. याची दखल घेऊन फुकेरी येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजस गंडे व सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश दत्ताराम रघुवीर आणि सिंधुदुर्ग विभागातील ज्येष्ठ गडसेवक आदींच्या संयुक्त विद्यमाने हनुमंत गड संवर्धनाचे काम हल्लीच हाती घेण्यात आले आहे.

Yograj Naik: गोव्यातील वेस्टर्न संगीतकारांना घेऊन फ्यूजन कार्यक्रम केले

या मोहिमेत येथील तरुण, तरुणी,ज्येष्ठ जाणकार मंडळी आदी संघटीतरित्या या गडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. यात मुंबई व गोव्यातील गडसेवकांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी झुंज देण्यासाठी हा गड उभा केला होता. पूर्वी संपूर्ण कोकण व गोवा भागाची टेहळणी याच हनुमंत गडावरून केली जात असे. हा गड फुकेरी गावापासून अंदाजे 4 ते 5 किलोमीटरवर आहे. गडापर्यंत जायला पक्का रस्ता नसल्याने, तेथपर्यंत जायला जंगलातून पायीच प्रवास करावा लागतो. या गडाची उंची 820 फूट आहे. त्याला एक मुख्य दरवाजा, अन्य दोन दरवाजे व एक दिंडी दरवाजा आहे. ते येथील मातीत गाढले गेले होते. तसेच पाच पाण्याच्या टाक्या, श्री पिसा देवीचे मंदिर, गडाच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या होत्या. अनेक वर्षे हा गड दुर्लक्षित राहिल्याने तो अत्यंत दयनीय स्थितीत दिसून येत होता. त्याचे संवर्धन व्हावे असे येथील युवा मंडळीला वाटल्याने या गडाचे काम हाती घेण्यात आले आहे. अजूनही बरेच काम बाकी आहे.

कळंगुट, बागा समुद्रकिनारे बनताहेत धोकादायक 

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या नोव्हेंबर 2020 पासून संवर्धन कामाची सुरवात झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या 8 ते 10 दुर्गसेवकांनी याकामी उत्साह दाखविला होता. आता गडसेवकांची संख्या वाढली आहे. सध्या ही संख्या आता 40 च्या घरांत पोचली आहे. यात मुंबई, गोवा येथील युवावर्गही निःस्वार्थपणे सहभागी होत आहेत. येथील काम पूर्ण झाल्यानंतर या गडाचा एक पर्यटन स्थळ म्हणून विचार होऊ शकतो. पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला या गडाचा मुख्य दरवाजा मातीतून अलग केला आहे. गडावर विजेची सोय नाही. कडक उन्हात काम करणे सेवकांना जोखमीचे ठरते. तरी निःस्वार्थी भावनेने त्यांनी या सेवेला स्वतःला वाहून घेतले आहे.

विजेची सोय नसल्याने जनरेटरच्या सहायाने रात्री उशिरापर्यंत तेथे काम चालू असते. यात मोठे दगड बाजूला करणे, कित्येक वर्षे मातीत गाढलेल्या तोफा अलग करून त्या साफ करण्याचे काम चालू आहे. अन्य बरीच कामे बाकी आहेत. गड संवर्धन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आयोजन समितीच्यावतीने असे आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी सुनील राहुळ (885141611) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हनुमंत गड संवर्धन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या या महान कार्यास आर्थिक मदत करायची असेल त्यांनी योगेश आईर यांच्याशी(9822102401) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

-किशोर स. नाईक

संबंधित बातम्या