मुख्यमंत्री पदक विजेता होमगार्ड विष्णू तेलगू 

होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या विष्णूने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पदक पटकावणे हे कौतुकास्पद होते.
Vishnu Telugu
Vishnu TeluguDainik Gomantak

प्रकाश धुमाळ

विष्णू आनंद तेलुगु यांचा उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या हस्ते उत्कृष्ट काम केल्याबद्दल, गांधीजी नॅशनल अवार्ड देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याला त्यापुर्वी मुख्यमंत्री पदकही प्राप्त झाले आहे.

हैदराबादहून गोव्यात आलेल्या परिवारात, गोव्यात जन्म घेतलेल्या व म्हापसा येथे होमगार्ड म्हणून नोकरी करणाऱ्या 56 वर्षाच्या विष्णूने आपल्या कामाच्या कौशल्याने देशाच्या राष्ट्रपती, प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री पदक पटकावणे हे नक्कीच कौतुकास्पद होते.

राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत होते त्यावेळी त्याला देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मडगाव येथे मुख्यमंत्री पदक प्रदान करण्यात आले. तो होमगार्ड म्हणून नेहमीच लोकांच्या सेवेमध्ये राहिला.

ज्या ज्या ठिकाणी त्याने काम केले त्या त्या ठिकाणी, वाहनाची कोंडी कमी कशी होईल याकडे लक्ष देणे हेच जणू त्याचे काम होते.

हैदराबाद येथून आल्यानंतर त्याचे वडील, आनंद तेलुगु म्हापसा पोलीस स्थानकामध्ये त्यांचे नोकरी करीत असत. विष्णूचा जन्म म्हापसा शहरातला. म्हापसा शहरातच तो मोठा झाला.

1988 साली होमगार्डमध्ये त्याने नोकरी मिळवली आणि गेली सुमारे 34 वर्ष तो ही नोकरी इमाने इतराबे करत आहे.

आपल्या या कारकीर्दीमध्ये आग्वाद तुरुंग, म्हापसा पोलीस स्टेशन, बेती आऊट पोस्ट, पणजी विधानसभा भवन अशा अनेक ठिकाणी त्याने आपले कर्तव्य निभावले आहे.

Vishnu Telugu
समुद्र स्नानाचा रिवाज

वाहतुकीची कोंडी झाली असेल व त्या ठिकाणी जर विष्णू तेलगु उपस्थित असेल तर तिथली कोंडी दूर करून रस्ता मोकळा करण्यात फार वेळ लागत नाही.

त्या कौशल्यात त्याचा हात धरणारा कोणीही नसल्याचे इतर सांगतात. ऊन, पाऊस असो वा इतर कुठलीही परिस्थिती असो, आतोनात मेहनत घेऊन वाहनांची कोंडी दूर करण्यात तो हार जात नाहीत.

ज्यावेळी होमगार्ड म्हणून 34 वर्षांपुर्वी विष्णू नोकरीत रुजू झाला त्यावेळी त्याला 22 रुपये पगार होता. त्या 22 रुपयांमध्ये तो आपले आणि आपल्या परिवारांचे सगळे भागवत होता.

त्या रकमेत आज काही प्रमाणात त्यात वाढ झालेली आहे परंतु ही वाढ कमी असून जी लोकं होमगार्ड म्हणून आज काम करत आहेत त्यांच्या पगारात आणखी वाढ व्हावी हीच त्याची मनापासून एकमेव इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com