भय इथले संपत नाही... गोव्याच्या राजकारणात उलथा पालथ

कशाहीच्या मजबुतीकरणासाठी विधानसभेत सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

कशाहीच्या मजबुतीकरणासाठी विधानसभेत सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निरंकुश सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी विधानसभा अधिवेशन, हे विरोधकांना संसदीय लोकशाही पद्धतीने दिलेले जालीम अस्त्र आहे. मात्र, विरोधक ते कशा पद्धतीने वापरतात, यावरच सामान्य माणसांचे प्रश्न सुटणे आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा होणे अवलंबून आहे. राज्यातल्या सत्ताधारी भाजपला विरोधक नको आहेत, म्हणून ते विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते सातत्याने करत आहेत. (Goa Politics Updated News)

Goa Congress
Goa Beach: समुद्राचे ऐकावेच लागेल

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार, हे जवळपास निश्चित झाले होते. तशी मोट बांधली गेली होती. मात्र, आमदारांची आवश्यक संख्या गाठता न आल्याने ''मिशन लोटस'' यशस्वी होऊ शकले नाही. मात्र, त्या फुटीचा परिणाम आतापर्यंत झालेल्या निम्म्या विधानसभेच्या कामकाजावर स्पष्टपणे जाणवत आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि सभागृहातील वरिष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावरच सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे पक्षाच्या दृष्टिकोनातून हे दोन आमदार काँग्रेसच्या खेम्यात नाहीत. काँग्रेसने दिलेली अपात्रता याचिकेचा पाठपुरावा आणि उरले-सुरले आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसची चाललेली धडपड खूप विलक्षण मानावी लागेल. नव्यानेच पक्षाचा ताबा घेतलेले प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर ही फूट रोखण्यासाठी प्रचंड धडपडताना दिसत आहेत. त्यांची दिल्लीवारी संपली असली तरी विधानसभेच्या कामकाजादरम्यान ते विधानसभेत सतत चकरा मारत आहेत. त्यामुळे पक्षाला अजून आपले आमदार फुटतील याची भीती कायम आहे.

त्यामुळेच ''भय इथले संपत नाही'' अशीच स्थिती काँग्रेसची झाली आहे. हे सारे नमनालाच घडाभर तेल घालण्याचे कारण म्हणजे, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची विधानसभा कामकाजातली भूमिका हा आहे. कारण कामकाज सुरू झाल्यापासून काँग्रेसची विधानसभा पटलांवरची एकत्रित रणनीती कधीच दिसून आली नाही. त्यामुळे सध्या तरी विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची भूमिका गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई निभावत आहेत. त्यांनी गोवा फॉरवर्ड, आप, आरजी आणि काँग्रेसचे उरलेसुरले आमदार घेऊन एकहाती किल्ला लढवणे सुरू केले आहे. त्याची झलक आज विधानसभेच्या कामकाजात दिसून आली. महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आज सरकारला अक्षरशः धारेवर धरले. झुवारी ॲग्रो केमिकल्सचा कथित जमीन घोटाळा, थ्री लिनियर प्रकल्पांना विरोध, याशिवाय छोट्या-मोठ्या विरोधकांच्या प्रश्नांना बळ देण्याचे काम सरदेसाई करत आहेत.

राजकारणात उलथा पालथ; काँग्रेस- भय इथले संपत नाही

Goa Congress
नवे भिडू, नवे राज्य

त्यांना काँग्रेसकडून हवी ती मदत मिळत नसली तरी काँग्रेसचे काही आमदार सरदेसाई यांच्याबरोबर किल्ला लढवताना दिसत आहेत. त्यात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुंकळ्ळीचे युरी आलेमाव आघाडीवर आहेत. आज विधानसभेचे कामकाज संपता-संपता गोमंतकीयांना खासगी संस्थांमध्ये 80 टक्के जागा मिळावी, पोगो बिल आणि सरकारकडून सातत्याने होत असलेली दुजाभावाची वागणूक, प्रश्नांना दिला जाणारा कमी वेळ, विरोधकांचा दबला जाणारा आवाज अशी कारणे देत त्यांनी आक्रमक भूमिका घेत वॉकआऊटचा निर्णय घेतला. सभागृहाच्या बाहेर येत कपाळावर काळा टिळा लावून सरकारच्या कामकाजाचा निषेध करत धोरणाचाही निषेध केला.

प्रश्नोत्तराच्या तासात झुवारी ॲग्रो केमिकल कंपनीच्या कथित जमीन घोटाळासंदर्भात सारे विरोधक एकत्र होत सरकारवर तुटून पडले आणि याचा परिणाम या संपूर्ण जमीन विक्री स्थगितीवर झाला. वेळ पडल्यास या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले. त्यानंतर युरी आले. सरकार पुढे रेटू पाहणाऱ्या थ्री लिनियर प्रकल्पामुळे राज्याची आणि राज्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची किती हानी होणार, यावरही विरोधक एकत्र झाल्याचे दिसून आले. एकूणच काय, सारे विरोधक एकत्रित होत आहेत. मात्र, त्याला काँग्रेसकडून कशी साथ मिळणार, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com