सावधान! कोरोनानंतर आता होऊ शकतो बुरशीजन्य संसर्ग

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

म्युकरमायकोसिस या प्रजातीची बुरशी आपल्या आजूबाजूला हवेमध्ये, मातीमध्ये, जनावरांचे शेण, कंपोस्ट अशा पर्यावरणातील अनेक बाबींमध्ये आढळून येते.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ (‘Myocardial infarction') नावाचा बुरशीजन्य संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. म्युकरमायकोसिस या प्रजातीची बुरशी आपल्या आजूबाजूला हवेमध्ये, मातीमध्ये, जनावरांचे शेण, कंपोस्ट अशा पर्यावरणातील अनेक बाबींमध्ये आढळून येते. म्युकरमायकोसिस शरीरात श्वासातून प्रवेश करते. एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर हा जंतुसंसर्ग रक्तवाहिन्या आणि उतींवरती गुणाकार करण्यास प्रारंभ करतो. या जंतुसंसर्गाचा वेग कर्करोगाच्या गुणाकारापेक्षाही खूप जास्त आहे. हा दुर्मीळ बुरशीजन्य रोग आपल्या पर्यावरणामध्ये अनेक वर्षांपासून असला तरीही आजपर्यंत त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम इतका गंभीर नव्हता. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे परिणाम धोकादायक आहेत, असे आढळून आले आहे. (Corona can now cause fungal infections)

गोव्याच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे मुस्लीम समाजातील पहिले मंत्री

कोरोनाचा व्हायरल लोड, स्टिरॉइड्स औषधांचा वापर यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली असते. म्युकरमायकोसिसचा संसर्ग कोरोनमुक्त रुग्णांमध्ये वेग पकडताना आढळून येत आहे. या संसर्गाचा धोका ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे, लोह ओव्हरलोड सिंड्रोम, डब्ल्यूबीसी संख्या कमी आहे, किंवा जे एचआयव्ही, कर्करोगबाधित आहेत, अशा रुग्णांना सर्वाधिक आहे.
म्युकरमायकोसिसचे लवकर निदान झाल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधल्यास, या संसर्गाचे निदान केले जाऊ शकते. कोरोनामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. तज्ज्ञ दंतचिकित्सक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी तयार केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून म्युकरमायकोसिसची लक्षणे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शोधली जाऊ शकतात. या रोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णाला जीवघेण्या परिणामांपासून वाचवता येते. आपण कोरोनामुक्त रुग्ण असल्यास, आपल्याला खालील लक्षणांवर नजर ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे:
  - अचानक हलणारा आणि सैल दात
  - टाळूवर काळ्या रंगाची निर्मिती
  - तोंडात अल्सरनिर्मिती
  - दात किंवा हिरड्यांमधून पस येणे
  - नाकातून काळा रक्तस्राव
  - नाक बंद होणे
  - सायनसजवळ वेदना
लवकर निदान होणे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. उपचारांत इंट्राव्हेनस (IV) अँटीफंगल औषधे किंवा सर्जिकल डीब्राइडमेंट (संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित उती कापून टाकणे) यांचा समावेश आहे.

कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांनी बाहेर जाताना एन 95  मास्क घालणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा म्युकरमायकोसिसचे बुरशीजन्य बीजाणू हवेतून आणि ओलसर वातारणातून पसरतात.
बाहेर जाताना लांब बाहीचे कपडे आणि ग्लोव्हज घाला. म्युकरमायकोसिसचे फंगल बीजाणू त्वचेवरील कट किंवा बर्न्सद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात.
जर वर नमूद केलेली लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

काय आहे हे म्युकरमायकोसिस ?
हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा, दात यापासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत पोचून दृष्टीवर परिणाम करू शकतो. काही प्रकरणांत तो जिवावरही बेतू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे

 

 

 

 

 

 

 

 

धोका कुणाला?
  -ज्येष्ठ नागरिक
  -नियंत्रणाबाहेर मधुमेह असलेले रुग्ण
  -रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात ‘हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी’ घेतली असल्यास कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार वाढल्यानंतरच लक्षात येत असल्याने डोळे आणि जीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यांपर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते.

अशी आहेत लक्षणे
-डोकेदुखी
-डोळे दुखणे
-डोळे बाहेर आल्यासारखे दिसू लागणे
-दोन-दोन प्रतिमा दिसू लागणे (डबल व्हिजन)
-दृष्टी अधू होणे
-गाल दुखणे/सुजणे
-काळपट अथवा तपकिरी रंगाच्या स्राव नाकातून येणे
 

उपचार

अशा प्रकारचा त्रास झाल्यास तातडीने नाक-कान-घसा तज्ज्ञांचा किंवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
बुरशीविरोधी औषधे प्रारंभीच्या टप्प्यात उपयोगी. प्रसार वाढला तर शस्त्रक्रिया हाच उपाय. शस्त्रक्रियेद्वारे सर्व मृत आणि संक्रमित भाग काढावा लागतो. वेळेत उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते, किंवा प्रसंगी जीवही गमवावा लागतो.
 

काय करायला हवे?

लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांशी संपर्क करा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासावे . कोरोनातून बरे झाल्यानंतर एअर कंडिशनचा वापर टाळावा, दमट किंवा ओलसर वातावरण टाळा.वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. मास्क नियमितपणे बदलावेत.

 

डॉ. विधी भानुशाली कबाडे 

 

 

 

 

संबंधित बातम्या