कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

पंधरा वर्षांनंतर साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान पुन्हा एकदा कोकणी भाषेतून लेखनप्रपंच चालवणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येणे ही कोकणी आणि गोव्यासाठीही खचितच अभिमानाची बाब आहे.
कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो
ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी
Damodar MauzoDainik Gomantak

कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) जाहीर झाला आहे. सर्वप्रथम या निष्ठावंत साहित्य सेवकाचे मनापासून अभिनंदन. पंधरा वर्षांनंतर साहित्य (Literature) क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान पुन्हा एकदा कोकणी भाषेतून लेखनप्रपंच चालवणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येणे ही कोकणी आणि गोव्यासाठीही खचितच अभिमानाची बाब आहे.

Damodar Mauzo
गोवा मराठी पत्रकार संघातर्फे म्हापशात मान्यवरांचा गौरव

दामोदर मावजो हे फक्त साहित्यिकच नव्हे, तर ते कोकणी राजभाषा चळवळीत आघाडीवरील नेते आहेत. कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यात ५५५ दिवसांचे उग्र आंदोलन (Protest) झाले. मावजो हे त्यातील बिनीचे शिलेदार. कोकणी भाषेला गोवा मुक्तिनंतर अवघ्या ६० वर्षांत दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यात आता मावजोंचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. कथा, कादंबरी, पटकथा लेखन, बालसाहित्य, नाटक, निबंध असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळणाऱ्या मावजोंसोबत ‘गोमन्तक’ने केलेला हा खास संवाद. या संवादातून मावजो यांनी आपल्या साहित्याविषयीचा प्रवास उलगडला...

संघर्षातूनच मिळाले यश

कोकणी भाषेच्या या संघर्षाविषयी विचारले माविजोंना विचारले तेव्हा ते म्हणाले, कोकणीला कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त झालेली नाही. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मग ती साहित्य अकादमीची कोकणीला मिळालेली मान्यता असो किंवा गोव्यात मिळालेला राजभाषेचा दर्जा असो. कोकणीने प्रत्येक गोष्ट झगडून मिळविलेली आहे. त्यामुळेच असे पुरस्कार मिळाल्यानंतर होणारा आनंद अधिक असतो. गोव्याचा आकार आणि एकूणच कोकणी लोकांची संख्या पाहता कोकणीने साहित्य क्षेत्रात जी भरारी मारली, ती निश्चितच नेत्रदीपक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Damodar Mauzo
गोवा सरकारकडून दिशाभूल; ‘आयआयटी’ आंदोलन पुन्‍हा पेटणार

स्पष्ट भूमिका मांडणारे कमी

मावजो हे आपली मते स्पष्टपणे मांडणारे साहित्यिक म्हणून परिचित आहेत. सध्या देशात काही प्रमाणात ‘फॅसिझम’ वृत्ती डोके वर काढू लागली आहे. त्यावर परखड भाष्य केल्याने ते सनातनी शक्तींच्या हिटलिस्टवर आहेत. त्यासाठी गेली तीन वर्षे त्यांना पोलीस संरक्षण दिले गेले आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर मावजो म्हणाले, जर समाजात वाईट प्रवृत्ती डोके वर काढत असतील तर त्यांच्याविरुद्ध आवाज उठविणे हे प्रत्येक साहित्यिकाचे कर्तव्य आहे, असे मला वाटते. त्यामुळेच माझ्या भूमिका मी स्पष्टपणे मांडतो. त्यासाठीचे जे परिणाम आहेत ते भोगण्याचीही मी तयारी ठेवतो. दुर्दैवाने काही साहित्यिक अशी स्पष्ट भूमिका घेत नाहीत. काही वेळा मला त्याची खंतही वाटते.

गोवा मुक्तीपूर्वी ज्या कोकणी भाषेला कुणी भाषाही म्हणण्यास तयार नव्हते, विरोधकांकडून ज्या भाषेची सतत अवहेलना झाली, त्या कोकणी भाषेला गोवा (Goa) मुक्तीनंतर अवघ्या ६० वर्षांत दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वांत आनंदाचा आहे. माझा खरा पिंड कथा लेखकाचाच आहे.

- दामोदर मावजो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com