दिवाळीचे फटाके यंदा जरा मोठ्याने वाजले!

दुखावलेले मन आनंद शोधत होते. यावेळीच सुदैवाने हवाहवासाच असणारा अगदी दिवाळीचा उत्सव आला. समाजाने जीवावर उदार होऊनही एक आव्हान घेतले. दिवाळीचा सण साजरा केला.
दिवाळीचे फटाके यंदा जरा मोठ्याने वाजले!
दिवाळीचे फटाके यंदा जरा मोठ्याने वाजले!Dainik Gomantak

दिवाळीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. कोविडमुळे सुमारे दोन वर्षे सर्व मनं प्रचंड दडपणाखाली होती. महामारीने उच्छाद मांडल्यामुळे समाज हादरला होता. खरे तर मन सुखावण्यासाठी अंतरांत आनंद बहरण्यासाठी एक उत्सव हवा होता. उत्सवाचे खरे प्रयोजनच ते उत्सवांत नरकासुर स्पर्धा झाल्या. ढोल ताशांच्या बहारदार वादनात कणकण बहरका ढोल ताशांवर वाजणारं ‘रमट’ म्हणजे गोव्याच्या लोकसंगीताचं एक श्रेष्ठ सादरीकरण लोकसंगीताचं आयोजनही तेच अंगात उत्साह बहरला. नरकासूर व कृष्णाचे नृत्यही उत्साहवर्धक आणि तो देखावाही खोल अंतरात सुखावणारा.

तसे गोव्यात फटाके व अन्य नेत्रदीपक दारूकामाची आतषबाजी कमीच. पण यंदा ती बरीच झाली. त्यामुळे प्रदूषण वाढते, हा आरोप जरी असला, तरी यंदा तरी ती हवीच होती. मुख्यत्वे आमच्या बालगोपाळांना यात खूपच आनंद मिळतो. आदरणीय सद्गुरूंनी तर यासाठी मालकांनी तीन दिवस वाहने न वापरता चालत ऑफिसला जाऊन ते प्रदूषण टाळून, मुलांना मात्र फटाके देऊन आनंद बहरू द्या असं म्हटले. सद्‍गुरू श्री श्री रविशंकर तर म्हणतात, की या उत्सवांत दारूकामाची आतषबाजी होणार म्हणून अनेक दिवस आधीपासून मुले अत्यानंदाने बहरतात. यातून सर्वांना नेत्रसुख मिळतेच. पण होणाऱ्या गडगडाटामुळे एखादे मन तणावग्रस्त असेल तर ते तणावमुक्त होतं. एखाद्या मनात वासना, हर्षा, मत्सर, राग, आदी वाईट भावना असल्या तर फटाक्याच्या गडगडाटात या वाईट वृत्तीचा व भावनांचा फुगा फुटतो. मन आनंदी व प्रेमळ होते. उत्सवांत असे सहज रमते. म्हणून फटाके आणि अन्य नेत्रदीपक दारूगोळ्याची आवश्‍यकता उत्सवांत आहेच.

दिवाळीचे फटाके यंदा जरा मोठ्याने वाजले!
'म्हादई' नदीच्या पात्रामुळे पूरण शेती हा जगण्याचा एकमेव आधार बनला!

दोनवर्षे कोविडमुळे उत्सव साजरे झाले नाहीत. कोणीही बाहेर येणे जाणे नाही. कोणी कोणाची भेट घेतली नाही. कुणाच्या घरी तर जाणे नाहीच. मुख्यत्वे मने कोमजलीत. एखादा मित्र मैत्रीण किंवा नातलग भेटतो, आपुलकी बहरते. गप्पा गोष्टी होतात. मने शांत होतात. पण कोविडमुळे सुमारे दोन वर्षे हे काहीच नाही. कोविड काळात विद्यार्थ्यांचे तर खूपच हाल झाले. घरीच बसून ऑनलाईन पध्दतीने मिळालेले शिक्षण. बऱ्याच जणांना या पध्दतीने ते व्यवस्थित मिळालेही नाही, आपली स्वप्न तुडवत, मित्र-मैत्रिणींपासून दूर जात एकाकी जीवन जगण्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नैराश्‍य आले. अनेक पालकांचीही मनःस्थिती बिघडली. आर्थिकस्थिती चुरगळली, ह्यातूनही अनेक विद्यार्थ्यांना अक्षरशः वेदना झाल्या.

दुखावलेले मन आनंद शोधत होते. यावेळीच सुदैवाने हवाहवासाच असणारा अगदी दिवाळीचा उत्सव आला. कोविडचा उग्रदाह बराच ओसरला होता. कोविड अजूनही आहेच. रोज मृत्यू आहे. पण मृत्यूचे प्रमाण ओसरलंय नवीन लागण झालेल्यास मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे महत्त्वाचे. अजूनही उत्सवाच्या वेळी गर्दी करणे गैरच. पण समाजाने जिवावर उदार होऊनही एक आव्हान घेतले. दिवाळीचा सण साजरा केला. नरकासुर स्पर्धा गर्दीतच झाल्या आणि अनेक बालगोपाळांच्या संघातूनच अनेक नरकासुर प्रतिमा साकारल्या. ह्यांतून चांगले झाले की वाईट झाले ते येणारा काळच सांगेल.कोविड संपला नाही, तरी अनेक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे.

दिवाळीचे फटाके यंदा जरा मोठ्याने वाजले!
मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात चित्रकार दिलेश हजारे यांचे चित्र

सांस्कृतिक कार्यक्रमांना आनंद लुटण्याचा दिवस अजून उजाडला नाही. आनंद व शांतीसाठी मन आसुलेले असले तरी संयम राखत अजूनही घरीच बसून टीव्हीवरील कार्यक्रमांतून मन रिझवणे करायला हवे. एकूणच उत्सव, सण हे संयमाने, थोडी काळजी घेऊनच साजरे करायला हवे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com