हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

यंदा कर्तव्य आहे म्हणत म्हणत दिवाळी गेली, उन्हाळा गेला, अनेक वर्षे झाली वय वाढत चाललं आहे. गावोगावी, शहरात भावी नवरदेव लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत, पण कोणी पोरगी द्यायला तयार नाहीये.

यंदा कर्तव्य आहे म्हणत म्हणत दिवाळी गेली, उन्हाळा गेला, अनेक वर्षे झाली वय वाढत चाललं आहे. गावोगावी, शहरात भावी नवरदेव लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत, पण कोणी पोरगी द्यायला तयार नाहीये. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने डोकं वर काढलं होत, हळूहळू रुग्णांची संख्या वाढायला लागली आणि देशाची वाटचाल देशव्यापी बंदकडे सुरू झाली. 23 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशव्यापी बंद केला. त्यामुळे शहरात कामासाठी गेलेले तरुण पुन्हा आपल्या गावी परत आले.त्यातील बरेच तरुण पुन्हा शहरात गेले पण काही तरुणांनी गावकडेच रहायला पसंती दिली. परिणामी बेरोजगारी वाढली आणि त्यामुळे आता मुलांचे लग्न जमायला अडचणी येऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू शेतकरी यांची मुलं जर शेती करत असतील तर त्यांना मुली द्यायला मुलींचे पालक आणि खुद्द मुली साफ नकार देत आहेत. (Don't give me a dowry, just give me a girl)

World Health Day Special : निरोगी आयुष्य म्हणजे सुखी जिवन

मुलींच्या आणि पालकांच्या मागण्या
मुलगी पाहायला गेलं की मुलीचे पालक पाहिला प्रश्न करतात मुलगा सरकारी नोकरीला आहे का? दुसरा प्रश्न मुलगा शहरात नोकरीला आहे का? मुलाचा पगार किती. मुलीच्या बापाला मुलाकडे भरपूर शेती पाहिजे पण मुलगा शेतकरी नको कारण ते सरळ उत्तर देतात आमची मुलगी शेतात काम करणार नाही. त्यामुळे अनेकांना लग्न जुळवायला कसरती कराव्या लागत आहेत. पूर्वीची परिस्थिती अशी होती मुलीच्या पालकांकडून चांगले लग्न, कपडालत्ता, हुंडा, दागिने याची मागणी केली जायची पण सध्या मुलांच्या पालकांवर आणि मुलांवर अशी वेळ आली आहे की सगळं आम्ही करयो तुम्ही फक्त मुलगी द्या! 

समाजातील परिस्थिती
समाजात मुली आहेत का? महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराचा विचार जर केला तर 1000 मुलांमागे 913 मुली आहेत, म्हणजे 87 मुलं ही आता बिना लग्नाची आहेत कारण काय तर मुलीच जन्मालाच आल्या नाहीत. 2011 मध्ये हे प्रमाण 924 होते ते आता कमी झालाय. त्यामुळे परिस्थिती अजून गंभीर होत चाललीये. मुलगी नको, पहिला मुलगाच हवा, मुलगी झाली तर ती रस्त्यावर टाकणं हे प्रकार घडत आहेत, या कारणांमुळे मुलींचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे मुलांवर "कोणी मुलगी देत कारे मुलगी" हे म्हणायची वेळ आली आहे. 

सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...

वरील गुणोत्तर आणि सर्व परिस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे, मग त्यात सर्व जाती आल्या. मुलगा आणि मुलगी यांच्या पालकांकडून सूर उठवला जातो मुलगा किंवा मुलगी बिना लग्नाची ठेवीन पण दुसऱ्या जातीमध्ये लग्न करणार नाही. मुलांची सध्या वय 32-33  झाली तरी लग्न होत नाहीये. मग नैराश्य येऊन मुलं आत्महत्ये सारखं पाऊल उचलतात.

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या देशात पहिली गोष्ट म्हणजे आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. त्याच कारण अस जर तुम्ही जातीपातीची दारं मोडून टाकली तर तुम्हला जिथे 100 मुलं/मुली बघायला मिळणार आहेत तिथे तुम्हाला 1000 मूल बघायला मिळतील आणि त्या 1000 मुलांमधून एक चांगला नवरदेव/नवरी निवडता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा सरकारी नोकरदार किंवा नोकरदार आहे तो आपल्या मुलीला सांभाळू शकतो का? खूष ठेऊ शकतो का? याची उत्तरं जर हो मिळाली तर मुली सुखी राहतील आणि मुलांचीही लग्न होतील.

 

संबंधित बातम्या