माधूरीला सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांनी तब्बल 120 वेळा घ्यायाला लावली होती गिरकी

Priyanka Deshmukh
शनिवार, 15 मे 2021

सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे फोटो काढण्यासाठी गेली होती. सिल्कचा कोट घातलेला फोटो काढताना तो हवेत उडावा या राजाध्यक्ष यांच्या कल्पनेतील फोटो थिमसाठी अनेक पंखे लावलेले असतानाही कोट काही केल्या उडत नव्हता.

मा-धुर्याला तुझ्या तोडच नाही
धु-सर होईल अशी त्यात खोडच नाही
री-त प्रितीची तुझ वर उगी जडली नाही
दिस- रात तू सपनात येऊन छळलीस
क्षि-तिजावरवरी स्वार होणारी परि तू ठरलीस
त-रूणाईच्या उरातली राणी तू बघ बनलीस....

     
"सौंदर्य हे स्री चे सामर्थ्य असते तर सामर्थ्य हे पुरूषांचे सौदर्यं" अबोध या सिनेमातून पदार्पण करत माधुरींन(Madhuri Dixit) आम्हाला तिच्या सामर्थ्यांची चुणूक दाखवून दिली. आता सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात फार मोठी तफावत असते. या दोन्हींचा सुरेख मिलाफ म्हणजे आमच्या माधुरीच माधुर्य स्मित हास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंर्यास चार चांद लावतात. जर आमच्या पीढीत लिओनार्दो द विन्सी(Leonardo da Vinci) जन्माला आला असता तर त्यानं माधुरीचं चित्र नक्कीच रेखाटल असतं. खोडकर मुलगी असो वा कणखर व्यक्तीरेखा रोमँटिक असो वा नृत्याचा बाज या सर्वच भूमिका साकारून तिनं आपल्या मनात अभिनयाचा न पुसला जाणारा ठसाच उमटवलाय अस म्हटलं तर वावगे ठरू नये....(Famous photographer Gautam Rajadhyaksha had made Madhuri Dixit twirl 120 times)

लग्नाआधीच डायरेक्टरने माधुरी दीक्षितसमोर ठेवली होती अनोखी अट, आणि...

"आजा पिया आई बहार" म्हणतं तरूणाईच्या गळ्यातलील ताईत बनलेली ही अप्सरा "हम आपके है कौन? सारख्या कौटूंबिक सिनेमातून आजी-आजोबांना ही आपलस करते.अर्थात दोन्हीं पिढ्यांच्या मनावर अधिराज्य फक्त तिनेचं गाजवलं असं म्हणायला ही हरकत नाही. अभिनय करणं म्हणजे फुकटचा मेवा चवीन खाण्यातला प्रकार मुळीच नाही. त्यास चविष्ट करून चाहत्यांना सिमेमाचा पुरेपुर आस्वाद देण्यासाठी कसब पणाला लावून मेहनत घेऊन अभिनय साकारावा लागतो. हेच ब्रीद लक्षात घेऊन लाखों चाहत्यांच्या मनात घर करणारी ही अप्सरा काम करताना आज्ञाधारकता व चिकाटीचा आदर्श ही ठेवते. आणि बॉलीवूडच्या बाजारात इतर अभिनेत्रींपेक्षा सरस ठरते. तिच्या या गुणाला जाणूनंच तर "पूर्णपणे दिग्दर्शकाची अभिनेत्री असणारी कोणतीही नटी भारतात नाही." अशी पुष्टी काजल ही देऊन मोकळी होते.

तिच्या कामा बाबत सांगायचे तर एकदा माधुरी दोन शिफ्ट करून संध्याकाळी सातच्या सुमारास सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष(photographer Gautam Rajadhyaksha ) यांच्याकडे फोटो काढण्यासाठी गेली होती. सिल्कचा कोट घातलेला फोटो काढताना तो हवेत उडावा या राजाध्यक्ष यांच्या कल्पनेतील फोटो थिमसाठी अनेक पंखे लावलेले असतानाही कोट काही केल्या उडत नव्हता. मग त्यांनी माधुरीला गिरकी घेऊन खाली बसायला सांगितल. हा प्रकार  तिने तब्बल 120 वेळा केला. कदाचित एखाद्या शूटसाठीही तिने इतके रिटेक दिले नसतील. यातूनच कामाबद्दलची चिकाटी आणि अज्ञाधारकतेची तिच्यातील आग काय होती ते दिसून येते. या घटनेनंतर जेव्हा  राजाध्यक्षांनी सॉरी बोलायला केलेल्या कॉलवर "मला खुप मज्जा आली" असे जेव्हा म्हणते तेव्हा तिच्या या बोलास नक्की काय उपमा द्यावी खरचं सुचत नाही. त्यांच्या सोबतच्या फोटो सेशन मधील आणखी एक किस्सा तिच्या सौंदर्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

‘मनी हाईट्स’ मधील ‘Bella Ciao’ च्या मराठी व्हर्जनमधून दिला जातोय सामाजिक संदेश 

सोनेरी केसांचा विग आणि लेदरच जँकेट देऊन क्लिक करण्याअगोदर "थिंक मन्ऱो" हेे बोल तिने इतके मनावर घेतले की, तिने दिलेल्या पोझ व चेहऱ्यावरिल भाव साक्षात मर्लिन मन्ऱोच देते असा भास झाल्याच वर्णन खुद्द राजाध्यक्षांनी करून ठेवलय. एवढच नव्हे तर फोटो प्रिंट काढताना लंडनमधल्या त्यांच्या प्रिंटरने अतिशय गंभिरपणे त्यांना विचारले की,मन्ऱोवर होणाऱ्या सिनेमात काम करायला या मुलीला आवडेल का?..मर्लिन मन्ऱो ही आतापर्यंतची जगातील सर्वात मादक स्री तिच्याबरोबरची तुलना हीच आपल्या माधुरीच्या सौंदर्याची पोहच पावती हे झाल आमच्या माधूरीच सुंदर दिसण आता सुंदर असणं काय असत?...याची ओळख करून देणारा माधुरीचा हा दुसरा किस्सा भन्नाट आहे. 

दादरच्या रूपारेल महविद्यालयातील सुधीर गाडगीळांना दिलेल्या पहिल्या मलाखतीत ती सुंदरता असणे काय असते याची जाणीव करून देते. मुलाखतीस सुरूवात करण्यापुर्वी पहिल्या रांगेत बसलेल्या सुलोचना दीदी सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे या तिघांना तिने वाकून केलेला नमस्कार मराठी संस्कृतीचे दर्शन देऊन जाणाराच होता. शेवटी राव वाण मराठी आहे. त्यामूळे संस्कृतीचं तिच्यात भान असणारच. आजही उकडीचे मोदक, पुरणपोळी आणि बटाटा पोहे या पदार्थाच्या आवडीत तिन आपला मध्यमवर्गीय मराठी बाणा जपल्याची साक्ष मिळते. बॉलीवूडमध्ये "डोला रे डोला...करणाऱ्या या अप्सरेला मराठीतला 'पिंजरा' सिनेमा आजही लय भारी वाटतो. माधूरीचा महाराष्ट्रीयन डॉ. श्रीराम नेने सोबत संसाराचा गाडाही झक्कास सुरू आहे. अस्सल मराठी तारकेला, बॉलीवूडमध्ये सम्राज्ञी सारखी वावरलेल्या, आपली जादू आजही कायम ठेवणाऱ्या मराठमोळ्या लावण्यवतीला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...

             उम्र तेरी बढी़ है पर सुरत तेरी वही है
              लाखों सांसों  की धडकनों में
               आज भी धक् धक् ...वहीं  है!...

संबंधित बातम्या