फूड ट्रक आणि तृप्तता...

फूड ट्रकवर तुम्हाला अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थ नक्कीच मिळतील.
Food Truck
Food TruckDainik Gomantak

पणजी: पणजीच्या आसपास संध्याकाळी फिरताना भूक लागली असेल तर रेस्टॉरंटऐवजी फूड ट्रकवरच्या पदार्थांचा स्वाद अवश्य घ्या. या बहुतेक साऱ्या फूड ट्रकवर तुम्हाला अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थ नक्कीच मिळतील. त्याशिवाय इतर कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थही तुमच्या जिभेला नक्कीच तृप्त करतील. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमची कुचंबणा होऊ शकते पण तुम्ही जर मांसाहारी खवय्ये असाल तर या फुड ट्रकवरचे खाद्यपदार्थ नक्कीच तुम्हाला स्वादानंद देतील. रोस-आम्लेटसारख्या पदार्थांपासून सुरुवात होऊन काफ्रियल, सॉसेज- पाव, क्रोकेट्स, स्टिक हे सारे चविष्ट खाद्यपदार्थ, खिशाला परवडणाऱ्या दरात प्लेटवरून तुमच्यासमोर हजर होतील.

Food Truck
रसरशीत जांब, उष्णतेवरचा सुरस उतारा

पणजीचे उपनगर असलेल्या सांताक्रुजच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करा. सांताक्रूझच्या फुटबॉल ग्राउंडपाशी रस्त्यावर उभ्या असलेल्या ‘अ‍ॅन्थेनाज’ फुड ट्रकवरचे बार्बेक्यू चिकन काफ्रीयल तुमच्या पोटाला नक्कीच सुखावेल किंवा तिथुन तसेच पुढे बांबोळीच्या दिशेने गेलात तर ‘जेरीस’ फुड ट्रक, अगदीच परवडणाऱ्या दरात, साठ रुपयात, तुमच्या पुढ्यात चिकन श्वार्मा हजर करेल. तिथलं चिकन स्टिकही त्याची वेगळी खासियत आहे. किंवा उलट्या बाजूने करंजाळेच्या दिशेने आलात तर तिथल्या सर्कलपाशी ‘अ‍ॅन्टोजितोस’ फूड ट्रकवर तुम्ही मेक्सिकन चिकन बर्गर ट्राय करू शकता. ‘अ‍ॅन्टोजितोस’च्या समोर थोड्याच अंतरावर असलेला ‘कॅफे लॉविट’ ग्रील पोळी सॅंडविचसाठी प्रसिद्ध आहे. चिकन काफ्रीयल, चिकन रेशाद व्यतिरिक्त हवाईयन चिकनसुद्धा तुम्ही तिथे चाखू शकता.

हे पणजीच्या उपनगरातले काही फुड ट्रक असले तरी केवळ तिथं थांबू नका. आजूबाजूच्या भागात आणखीही फुड ट्रक वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृतीनी आपले उदरभरण करण्यास सज्ज आहेत. त्यांचाही शोध घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com