Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा

गणपती उत्सवाचा हा सोहळा अनेकांसाठी, एकत्रित येऊन एकमेकांच्या कुशलतेत समाधान शोधणारं स्नेहसंमेलन असतं.
Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचाDainik Gomantak

आपल्या गावाकडच्या घरापासून दूर असलेल्यांची लगबग आता सुरू झाली असेल. गणपतीच्या निमित्तानं गावाकडचं घर जवळ येतं. वर्षभर एकमेकांना न भेटणारे चतुर्थीत उराउरी भेटतात. जगण्यासाठी इतरत्र पसरलेले हे सारे आपली मुळे सुखासिनतेने पुन्हा चाचपून पाहतात. गणपती उत्सवाचा हा सोहळा अनेकांसाठी, एकत्रित येऊन एकमेकांच्या कुशलतेत समाधान शोधणारं स्नेहसंमेलन असतं.

Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी

मात्र मागच्या गणेश चतुर्थीपासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. कोरोनाच्या सावटाखाली भक्ती-भावनेचे आणि आराधनेचे परंपरागत नेम बदलून गेले आहेत. भय, विस्मय, अगतिकता, नियम यांच्या प्रचंड भोवऱ्यात गरगरून आपले दैनंदिन आयुष्य एका वेगळ्या रुळावर येऊन टेकले आहे. मात्र या वेगळ्या रुळावरून पुढे सरकतानाही देव, धर्म, अध्यात्माचे बोट भक्ती-पंथियांनी कसोशीने धरून ठेवले आहे. नेम-नियम बदलले तरी अंतरातला दिवा तोच आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात ते जाणवलं. यंदाच्या गणेशोत्सवातही गणपतीबाप्पा आपल्या भक्तांची भक्ती अशा वेगळ्या तराजूतच जोखतील.

Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
Ganpati Chaturthi 2021: आपल्या लाडक्या बाप्पासाठी श्रीखंड, बासुंदी अन् मोदकाचा प्रसाद...

नाहीतरी गेली काही वर्षे पर्यावरणासंबंधी सजग असणाऱ्यांनी चतुर्थीत फटाके लावणे सोडून दिले आहे. विसर्जनावेळी पाण्याचे प्रदूषण होते म्हणून घरच्या घरी वेगवेगळ्या पर्यावरणपूरक तऱ्हांनी मात्र गणपतीशी भाावनात्मक संबंध पूर्वापार राखून त्याला आनंदे निरोप दिला होता. भक्तिमूल्य आणि आपल्या भाेवतालच्या निसर्गाचे भान याच्या सुंदर मेळाची सुुरुवात नाहीतरी अशी झालीच होती. कोरोनामुळे ती अधिक सजग झाली. गेल्या वर्षी अनेक कुटुंबातली कर्ती मंडळी गणपती पूजेचे सारे विधी-मंत्र शिकली. कर्माने ब्राह्मणत्व पत्करून त्यांनी गणपती अधिष्ठानाला आणि ‘स्व’त्वाला मंत्रवत पवित्रता दिली. देव-भक्तांच्या अद्वैत भावनेला कोरोनाच्या अरिष्टकालात असे बळ आले. देवाप्रतिच्या भावनेला नवी स्वीकारार्हता लाभली.

Ganesh Chaturthi 2021: मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची तपासणीच नाही

गणपतीचे यंदाचे आगमन आता अवघ्या दिवसांवर आलंय. मखर-माटोळीतून, रांगोळी-वातींतून उत्सवाचे रंग आणि तेज घराघरातून फाकेलच. मात्र साऱ्या कर्मकांडातून मुक्त होत देवाच्या केलेल्या आराधनेत आपण पुन्हा ‘मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा’ अशा देवत्वाच्या पातळीवर असलेल्या ‘गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा’ देवाला पुन्हा सामोरे जाऊ.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com