कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्याला महत्त्व द्या

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

ज कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्याचा जागतिक दिन साजरा करण्यात येत असून हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ हेतू वेगळा असला, तरी सध्या कोरोना महामारीच्या प्रचंड मोठ्या फैलावामुळे या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ज कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्याचा जागतिक दिन साजरा करण्यात येत असून हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ हेतू वेगळा असला, तरी सध्या कोरोना महामारीच्या प्रचंड मोठ्या फैलावामुळे या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वांनी योग्य खबरदारी घेणे आणि आपले आरोग्य जपणे अत्यावश्यक बनलेले आहे.(Give importance to safety and health in the workplace)

सदर दिवस दरवर्षी 28 एप्रिल रोजी कामाच्या ठिकाणी होणारे अपघात आणि पसरणारे आजार रोखण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. 2003 पासून हा दिवस साजरा करण्यास आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सुरुवात केली.  गेल्या वर्षीही हा दिवस असाच कोरोना महामारीच्या सावटाखाली साजरा झाला होता. गेल्या वर्षी या दिवसाची संकल्पना ''महामारीला रोखा: कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य प्राण वाचवू शकते'' अशी होती. तर या वर्षी ''समस्यांचा अंदाज बांधा, तयार राहा आणि प्रतिसाद द्या : कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य व्यवस्थांमध्ये आताच गुंतवणूक करा'' या संकल्पनेवर भर देण्यात आलेला आहे. 

जागतिक वसुंधरा दिवस : आताच सावध व्हा; नाहीतर खूप उशीर होईल

कोरोना महामारीमुळे सरकार, कर्मचारी, मजूर आणि इतर सर्वसामान्य लोकांसमोर मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत. जगभरातील कामांवर व कामाच्या स्वरूपावर त्याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य याविषयी सरकार, कंपन्या व कर्मचारी यांनी अतिशय सतर्क बनणे हे एकंदर परिस्थितीमुळे आवश्यक बनले आहे. 

मास्क कटाक्षाने वापरा
कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी कशी सुरक्षा घ्यावी याविषयी डॉ. व्यंकटेश हेगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर कटाक्षाने करावा असा सल्ला दिला. कोरोना हा कुणाच्या तरी नाकातून, कुणाच्या तरी तोंडातून पसरत असतो वा सदर विषाणू हवेत असतो. त्यामुळे मास्कचा वापर हा कार्यालयात ये-जा करताना व कार्यालयात काम करताना सुद्धा करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, याकडे डॉ. हेगडे यांनी लक्ष वेधले.

''सोशल डिस्टंसिंग''ही महत्त्वाचे
त्याचप्रमाणे सोशल डिस्टंसिंगचेही कार्यालयांमध्ये पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्दी व अनावश्यक कार्यक्रम टाळायला हवेत. कार्यालयांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था असायला हवी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवायला हवेत किंवा सॅनिटायझरचा वापर करायला हवा. बाहेरच्या माणसांना सहसा कार्यालयाच्या आंत घेता कामा नये तसेच कर्मचाऱ्यांनी लिफ्टचा वापर टाळण्याकडे कटाक्ष ठेवायला हवा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

सध्याच्या परिस्थितीत शक्य असल्यास कर्मचाऱ्यांनी कामावर येऊ नये व घरूनच काम करावे. मात्र काही जणांना कामावर येण्याशिवाय पर्याय नसतो. उदाहरणार्थ डॉक्टर व परिचारिकांना रुग्णांना हाताळावेच लागते. त्यामुळे त्यांच्यासमोर कोविडच्या संसर्गाला तोंड द्यावे लागण्याचा धोका असतो. देशभरात अनेक डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झालेला असून काहींना मृत्यूही आलेला आहे. त्यामुळे डॉक्टर्स व परिचारिकांना पीपीई कीट व खास प्रकारचा मास्क वापरून काम करावे लागते. थोडक्यात कामावर यावे लागलेच, तर सर्व प्रकारची सतर्कता व खबरदारी घ्यायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला.

-अंकिता गोसावी

संबंधित बातम्या