Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?

भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक वाढले, काँग्रेसमध्येही दावेदार अधिक, नवोदितांना आमदार बनण्‍याची स्‍वप्‍ने
Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?
Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?Dainik Gomantak

शिरोडा: शिरोडा (shiroda) मतदारसंघात गत पोटनिवडणुकीवेळी प्रमाणेच विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हे पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवतात की त्यांचे गेल्या काही वर्षांतील निकटचे प्रतिस्पर्धी ज्यांनी नुकताच ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे, ते माजी मंत्री महादेव नाईक हे शिरोडकरांना रोखण्यात यशस्वी होणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिरोडा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडच्या काळात मतदारसंघातील बोरी, शिरोडा, पंचवाडी आणि बेतोडा-निरंकाल-कोनशे-कोडार या चारही पंचायत क्षेत्रांमध्ये अनेक सुशिक्षित पदवीधर युवक, तसेच उद्योजक तयार झालेले आहेत. ते आपल्या परीने सामाजिक कार्य करीत आहेत. अनेकजण आपल्या गावातील प्रभागात पंचायत निवडणूक लढवून सदस्य बनलेले आहेत. पाच वर्षांनी अनेकांना आपण विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरून आमदार बनण्याची स्वप्ने पडत आहेत.त्या दृष्टीने राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी पक्षश्रेष्‍ठींचे उंबरठे झिजवले जात आहेत. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर स्वतंत्र उमेदवार म्हणून राहण्याची तयारीही काहींनी दर्शवली आहे.

तुल्‍यबळ लढत शक्‍य

मतदारसंघात सुभाष शिरोडकर सातवेळा निवडून येऊन आमदार आणि विविध खात्याचे मंत्री बनले. 2017 साली शिरोडकर हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले. परंतु नंतर दीड वर्षानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी शिरोडा मतदारसंघात 2019 साली पोटनिवडणूक झाली. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी मगोचे उमेदवार दीपक ढवळीकर यांच्याशी कडवी झुंज देत शिरोडकर भाजपचे आमदार बनले. सुभाष शिरोडकर यांना 10661 मते, तर दीपक ढवळीकर यांना 10585 मते मिळाली. आगामी निवडणुकीत आमदार शिरोडकर हेच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. परंतु भाजपचे अनेक सच्चे व मुळापासूनचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना उमेदवारीसाठी साकडे घालत आहेत.

Dainik Gomantak

दीपक नाईकही चर्चेत

बोरी मतदारसंघ जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर या मतदारसंघावर सतत दोन वेळा निवडून येऊन बोरी, बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार या गावात त्यांनी भरीव अशी विकासाची कामे केली आहेत. या भागात त्यांची लोकप्रियता आहे. त्याचे कार्य पाहून अनेक मतदार नाईक बोरकर यांना भाजपची उमेदवारी मिळावी, अशी मागणी करीत आहेत. तसेच त्यांनी निवडणुकीत उतरावे म्हणून आग्रह करीत आहेत. पक्षश्रेष्ठींनी आपणाला उमेदवारी दिली, तर आपण अवश्‍य निवडणूक लढवीन, असे ते सांगतात. पण, लोक व कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेण्याची त्यांची तयारीही आहे.

उमेदवारीसाठी अनेक दावेदार

शिरोडा बाजारात राहणारे भाजपचे कार्यकर्ते दयानंद सुर्या नाईक, बोरीतील माजी पंच दिनेश नंदा रायकर, पंच तुकाराम बोरकर हेही भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी पक्षाच्या कामास झोकून दिल्याने पक्षात त्यांचा वावर जास्त आहे. साहजिकच अनेकजण त्यांना पक्षाची उमेदवारी मिळावी, असे सूचवतात. पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्यांच्या मागे राहण्याची त्यांची तयारी आहे. शासकीय नोकरीतून सेवा निवृत्त झालेले बोरीचे मुकेश नाईक यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत.

Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?
Goa Election: ‘तृणमूल’च्या ‘एन्‍ट्री’ ने गणित बदलणार

अभय प्रभू मगोतर्फे इच्छूक

2017 च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार असलेले बेतोडा-निरंकाल गावचे उद्योजक अभय प्रभू यांना 5815 मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत ते काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिरोडा मतदारसंघात अभय यांचे वडील रामचंद्र (बाबय) प्रभू हे आमदार म्हणून निवडून आले होते. बेतोडाचे माजी सरपंच व विद्यमान पंच, शिरोडा गट काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले सुशांत गावकर यांनाही पक्षाबद्दलची निष्ठा पाहून पक्षश्रेष्ठी आपणाला उमेदवारी देतील, असे वाटते.

मगोच्‍या भूमिकेकडे लक्ष

2019 पोटनिवडणुकीत मगोचे उमेदवार दीपक ढवळीकर यांना 76 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. दीपक यांनी पुन्हा या मतदारसंघात निवडणुकीला उभे राहावे, असे मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना वाटते. परंतु, मगोने संकेत रामचंद्र मुळे यांचे नाव पुढे केलेले आहे. मगोचा निर्णय शेवटी काय असेल, हे येणाऱ्या काळात कळेल.

Goa Election: शिरोडकर गड पुन्हा सर करणार का?
Goa Election: सांताक्रुझ मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत शक्य

डॉ. प्रभुदेसाईंचे आव्‍हान

शिरोडा गावातील लोकप्रिय डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांनी मगोची उमेदवारी ही मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला दिल्यास आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे जाहीर केले आहे. शिरोडातील म्हाळू गंगाराम नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप कृष्ण शिरोडकर हेही निवडणुकीत उतरणार आहेत.

‘त्‍यां’नी सोडले मौन!

भाजपच्या उमेदवारीवर दोन वेळा निवडून येऊन आमदार व मंत्री बनलेले महादेव नाईक यांनी 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष शिरोडकर त्यांनी2019 मध्ये भाजपात प्रवेश केल्यावर महादेव नाईक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पोटनिवडणूकीत शिरोडकर हे भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्यावर महादेव बराच काळ मौन पाळून होते.

फॉरवर्डतर्फे मुल्ला

गोवा फॉरवर्डतर्फे उद्योजक अकबर मुल्ला यांना उमेदवारी निश्‍चित झालेली आहे. शिवाय आरजीचा उमेदवारही या मतदारसंघात असणार आहे. आता तर माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे येथे तृणमूलचा उमेदवारही असणार आहे.

Related Stories

No stories found.