Goa: गोव्याच्या पत्रकारितेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व 'अनंत साळकर'

Goa: गोवा बारावी कला शाखेत संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केलेले डिचोलीतील अनंत साळकर यांचा परिचय
Goa | Anant Salkar
Goa | Anant SalkarDainik Gomantak

Goa: गोवा शालांत मंडळाने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या बारावी कला शाखेत संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केल्याने डिचोली तालुक्यातल्या पिळगावातील अनंत साळकर या व्यक्तिमत्त्वाचे नाव माझ्यासाठी परिचयाचे होते. परंतु विद्यार्थी दशेपासून एक प्रचलित प्रवाहापलीकडचा विचार करणारा आणि आपण स्वीकारलेला मार्ग जरी कंटकांचा असला तरी पायतळी अंगार असताना त्यावर चालत राहाणारी व्यक्ती म्हणून अनंत साळकर माझ्यासाठी आकर्षणाचा बिंदू होता.

त्याकाळी सत्तरी, डिचोलीतल्या बारावीनंतरच्या शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांना म्हापसा किंवा पणजीतल्या महाविद्यालयात जाण्याचे पर्याय खुले होते. त्यावेळी म्हापशाच्या टेकडीवर वसलेल्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये अनंत साळकर यांचा परिचय झाला आणि तेव्हा विद्यार्थीदशेत झालेल्या परिचयाचे रूपांतर त्यांनी मराठी पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर मैत्रीत झाले.

Goa | Anant Salkar
Goa News: ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकरांना 'गुज'तर्फे आदरांजली

आज गोव्यातल्या लोह, मँगनिजसारख्या खनिजांचे उत्खनन करणाऱ्या खाणींचा व्यवसाय अराजकता आणि बेकायदेशीरपणाचा कळस गाठल्याने स्थगित झाला आहे. एकेकाळी खाण व्यवसायाने आरंभलेल्या बदेलीविरुद्ध तसेच जल, जंगल, जमीन आणि जैविक संपदेच्या ऱ्हासाच्या विरोधात लिहिणे याची कल्पना करणेही मुश्‍किल होते.

अशा कालखंडात गोवा आवृत्तीप्रमुख अशी महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या अनंत साळकरांकडे खाणींमुळे निर्माण झालेल्या असंख्य प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी लेखमालेचा प्रस्ताव ठेवला असता, त्यांनी निर्भीडपणे प्रतिसाद दिला. ‘खण खण माती’ ही लेखमाला प्रत्ययकारी छायाचित्रे आणि याविषयीची क्षेत्रिय निरीक्षणे आणि अभ्यासाद्वारे त्यांनी प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखवले.

Goa | Anant Salkar
Goa Government: गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही- सदानंद शेट तानावडे

1986 सालच्या पर्यावरण संरक्षण कायद्याची पदोपदी पायमल्ली करत गोव्यातल्या सत्तरी, सांगे, धारबांदोडा, डिचोली अशा तालुक्यांत खाण व्यवसाय चालू असल्याने त्याविरोधात एखाद्या वर्तमानपत्रात लेखमाला प्रकाशित करण्याचे धाडस दाखवणे ही सहज, सोपी बाब नव्हती. या लेखमालेमुळे त्याकाळी सार्वजनिक जनसुनावणीत गोव्यातल्या खाण व्यवसायातल्या बेकायदेशीरपणाविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि मार्गदर्शन लाभले.

‘खण खण माती’प्रमाणे जंगल, पर्यावरण, निसर्ग संपदा याविषयीच्या लिखाणासंदर्भात आग्रह धरून ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणारा आवृत्तीप्रमुख, संपादक, साहाय्यक संपादक या नात्याने एका निर्भयी पत्रकाराचे आणि इथल्या माती, संस्कृती आणि पर्यावरणावर अमाप प्रेम करणाऱ्या गोमंतकीय भूमिपुत्राचे निरंतर दर्शन घडले आहे. ज्या पिळगावात त्यांचे बालपण, तरुणपण व्यथित झाले, त्या गावाविषयी आत्मीयता त्याच्या हृदयी नित्य वास करत आली आहे.

Goa | Anant Salkar
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार बिनविरोध

विवाहबद्ध होण्यापूर्वी पिळगावात त्यांच्यासोबत तिथल्या खाणमातीमुळे पडिक असलेल्या शेतातून फिरताना त्यांच्या तोंडून गावाच्या ऱ्हासासंदर्भातली त्यांची व्यथा ऐकून मन विषण्ण व्हायचे. मांडवी नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या पिळगावचे गतवैभव उद्ध्वस्त करण्यास खाण व्यवसाय कसा कारणीभूत ठरला आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता आणि पर्यावरण, जंगल यांचे संवर्धन आणि संरक्षण करत हा व्यवसाय कसा करता येईल, याचा ऊहापोह त्यांनी वेळोवेळी केला.

मराठी, इंग्रजी आदी भाषांतील साहित्यांचे वाचन, मनन आणि चिंतन केल्याकारणाने त्याने आपल्या लेखमालेतून, संपादकीयांतून जे विषय मांडलेले वाचकांना भावलेले आहे. उच्च शिक्षण संपादन केल्यानंतर सरकारी नोकरीच्या मागे लागण्याऐवजी किंवा महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांत अध्यापन करून पैसा, प्रतिष्ठा कमावण्यापेक्षा आपल्याला विशेष आवडणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात भरभक्कमपणे पाय रोवून राहाण्यात त्यांनी धन्यता मानली.

Goa | Anant Salkar
Goa: पेडणे येथील 'पुनव' उत्‍सवाला भाविकांची अलोट गर्दी

बंगला, चारचाकी गाडी, सोन्या-चांदीचे दागिने यांची कधी त्यांनी आस बाळगली नाही की ऐशोरामाचे जीवन स्वीकारण्याला कधी प्राधान्य दिले नाही. जेथे जेथे त्यांनी पत्रकारिता केली, तेथे माणसे जोडण्याचीच गर्भश्रीमंती त्यांनी कमावली आणि त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम केलेल्या व्यक्तींनी पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात नावलौकिक संपादन केला आहे. कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी प्रासंगिक विषयांवर अनेक लेख लिहिले. आपणाला जे माहिती नाही, ते तज्ज्ञांकडून जाणून घेण्यात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही.

ग्रामीण भागातून नोकरी उद्योग-धंद्यासाठी जे शहरात गेले, त्यांनी तेथेच बंगला घेऊन स्थायिक होण्याला प्राधान्य दिले. पण त्यांनी गावाकडचे नाते कायम राखून, तेथील मृद्‍गंधाची बेहोशी अनुभवण्यातच धन्यता मानली. त्यांची मुलगी मेखला हिने दहावीच्या परीक्षेत 97.83 टक्के गुण संपादन केले आणि विज्ञान शाखेत जाण्याऐवजी कला शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिच्या महत्त्वाकांक्षेचा त्यांनी यथोचित आदर- सन्मान केला.

Goa | Anant Salkar
Goa Government: गोव्यात फिजिओथेरपीसाठी मंडळ स्‍थापणार!

विज्ञान शाखेमधून इंजिनियर, डॉक्टर होण्याऐवजी इंग्रजी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिला डॉक्टरेट संपादन करण्याची जी मनीषा आहे, तिचे त्यांनी सतत समर्थन केले. केवळ शालेय शिक्षणाद्वारे अभ्यासक्रमात सतत गुंतून राहाण्याऐवजी त्यांनी मेखलाच्या अंगी नृत्य, नाट्याची गोडी वृध्दिंगत केली.

धनदौलत कमावण्याऐवजी मित्र-मैत्रिणींशी ऋणानुबंध त्यांनी सतत जपले. पत्रकारितेतून पैसा, प्रतिष्ठा कमावण्याऐवजी त्यांनी मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे सतत प्रयत्न केले. संसाराचा रहाटगाडा हाकताना आपल्या इच्छा-आकांक्षा मर्यादित ठेवण्याचे भान त्यांनी राखले आणि त्यामुळे भरपूर पगार, ऐशोराम यांची मागणी त्यांनी कधीच व्यवस्थापनाकडे केल्याचे ऐकिवात नाही.

Goa | Anant Salkar
World Mental Health Day: मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज

विपुल कविता, ललित लिखाण केलेले असताना ते पुस्तक रूपात आणण्यासाठी त्यांनी धडपड केली नाही. सांसारिक व्यापा-तापांना निर्भीडपणे सामोरे जात त्यांनी वाचन, लेखणातली उर्मी कायम जोपासली आणि जीवन जगण्यातला आनंद पत्नी आणि एकुलत्या एका मुलीबरोबर वृद्धिंगत करण्यात धन्यता मानली. पत्रकारितेतून सतत मानवी मूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवून विविध विषयांवरचे लिखाण सुरू ठेवून वाचकांना निर्व्याज, निखळ समाधान देण्याबरोबरच वास्तवाचे भान ठेवण्यास कार्यप्रवण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com